Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्व, जाणून घ्या या मागील कधी न ऐकलेली कहाणी

मकर संक्रांतीला तिळाचे काय महत्व, जाणून घ्या या मागील कधी न ऐकलेली कहाणी
, रविवार, 12 जानेवारी 2020 (10:06 IST)
एका आख्यायिकेनुसार शनिदेव त्यांचा वडिलांना आवडत नसे. त्यांनी शनिदेव आणि त्यांच्या मातोश्री देवी छाया यांना स्वतः पासून विभक्त केले. त्या दोघांना सूर्यदेवांचा राग आला असून त्यांने सूर्यदेवास कुष्ठरोगाचा श्राप दिला. त्या श्रापामुळे सूर्यदेवांना कुष्ठरोग झाला.
 
वडिलांना या त्रासात बघून यमराज (हे सूर्यदेवांच्या दुसऱ्या पत्नी संध्या चे पुत्र होय). यांनी तपश्चर्या केली. त्या तपस्येमुळे सूर्यदेव कुष्ठरोगांपासून मुक्त झाले. सूर्यदेवांना शनिदेवांचा आणि छाया देवीचा प्रचंड राग आला आणि त्यांनी त्या दोघांचे घर(कुंभ- ही शनीची रास आहे) जाळून टाकले. त्यामुळे त्या दोघांना त्रास सहन करावा लागला.
 
यमराजाला त्यांच्या सावत्र भाऊ आणि सावत्र आईला कष्टात बघून वाईट वाटले. त्यांनी आपल्या वडिलांना समजावले. त्यामुळे सूर्यदेव शनीस भेटावया त्यांचा घरी गेले. कुंभ ला पेटविल्यावर फक्त काळे तिळांना सोडून सर्वे काही जळाले होते. त्या काळ्या तिळानेच शनिदेवाने आपल्या वडिलांची पूजा केली. त्यामुळे प्रसन्न होऊन सूर्यदेवाने शनीस त्याचे दुसरे घर 'मकर' दिले. 
 
त्या दिवसापासून असे मानले जाते की तिळामुळेच शनी देवास घर आणि आनंदाची प्राप्ती झाली. त्या दिवसापासून मकर संक्रांतीला सूर्यदेवाची पूजा करण्याचे महत्व आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घे भरारी.... संक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्त्व