Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिवाळ्यात, तीळ नक्की वापरा आणि त्याचे भरपूर लाभ मिळवा

हिवाळ्यात, तीळ नक्की वापरा आणि त्याचे भरपूर लाभ मिळवा
, सोमवार, 28 जानेवारी 2019 (17:28 IST)
आरोग्यासाठी तीळ वापरणे अत्यंत फायदेशीर आहे. आयुर्वेदानुसार, तीळ बलवर्धक मानण्यात आले आहे. हिवाळ्यात हे वापरणे फायदेशीर मानलं जात. तिळामध्ये पोषक तत्त्वांचा खजिना असतो. त्यात पुरेसे प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळत, ज्यामुळे ते भूक वाढवत, अन्न पचनात सहाय्यक असते.   
 
तीळ खाण्याचे फायदे :-
 
1. तिळाच्या प्रयोगाने मानसिक विकार कमी होतो, ज्याने तुम्ही तणाव, नैराश्यापासून मुक्त राहता. दररोज थोड्या प्रमाणात तिळाचे सेवन करून तुम्ही मानसिक समस्या टाळू शकता.
2. तीळ वापरणे केसांसाठी वरदान असल्याचे सिद्ध होऊ लागले आहे. तिळाच्या तेलाचा वापर किंवा दररोज थोड्या  प्रमाणात तिळाचे सेवन केल्याने केसांच्या गळतीवर रोख लागते.  
3. तिळाचा प्रयोग चेहर्‍यावर चमक आणण्यासाठी देखील केला जातो. दुधात तीळ भिजवून ते तोंडावर लावण्याने चेहर्‍यावर नैसर्गिक चमक येते आणि रंग देखील चमकतो. याशिवाय, तिळाच्या तेलाने मालीश केल्याने त्वचा मऊ होते. 4. तीळ कुटून खाल्ल्याने कब्ज्याचा त्रास होत नाही, तसेच काळे तीळ चावून खाल्ल्यानंतर थोडं गार पाण्याचे सेवन केल्याने मूळव्याधीत लाभ होतो. याने जुने मूळव्याध देखील ठीक होण्यास मदत मिळते.  
5. शरीरातील कोणताही भाग भाजला गेला असेल तर त्या भागात तीळ वाटून त्यात तूप घालून पेस्ट तयार करावी, ती पेस्ट त्या भागास लावल्याने आराम मिळतो.  
6. कोरडा खोकला झाल्यावर तिळाला मिश्री आणि पाण्यासोबत घेतल्याने आराम मिळतो. त्याशिवाय तिळाचे तेल व लसूण उकळून ते तेल कानात घातल्याने कान दुखीत फायदा होतो.  
7. हिवाळ्यात, तीळ शरीरात ऊर्जा प्रसारित करते, आणि तेल मालीश वेदनेतून आराम देते.
8. तीळ दातांसाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी आणि संध्याकाळी ब्रशिंग नंतर तीळ चावण्याने दात मजबूत होतात,
आणि हे कॅल्शियम देखील पुरवतात. 
9. पायात भेगा झाल्यास तिळाचे तेल गरम करून त्यात रॉक मीठ आणि मेण मिसळून लावल्याने भेगा लवकर बर्‍या होतात आणि पाय मऊ आणि नरम होण्यास मदत मिळते.  
10. तोंडात छाले झाल्यास तिळाच्या तेला थोडे सेंध मीठ घालून त्या जागेवर लावल्याने छाले लवकर बरे होण्यास मदत मिळते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गुणसंपन्न बोर