Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्रांतीचा सण या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आणणार आनंद

मकर संक्रांतीचा सण या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आणणार आनंद
, मंगळवार, 11 जानेवारी 2022 (12:53 IST)
मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी 2022 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. सध्या शनिदेव आणि ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशीत भ्रमण करत आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत तीन ग्रहांचा संयोग होईल. ज्याला त्रिग्रही योग म्हणतात. ग्रहांच्या या अद्भुत संयोगाचा लाभ अनेक राशींना मिळेल. जाणून घ्या कोणत्या राशींवर पडेल सूर्यदेवाची कृपा-
 
मेष- सूर्याच्या  गोचरमुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात काही नवीन जबाबदारी मिळू शकते. वडिलांशी संबंध सुधारतील. सूर्याच्या भ्रमणात सरकारी नोकरी मिळू शकते. मेष राशीचा शासक ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांसाठी सूर्याचे संक्रमण लाभदायक ठरेल.
 
सिंह - सूर्य देव हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे. अशा स्थितीत सूर्याचे भ्रमण तुमच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करेल. या काळात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगले निकाल मिळू शकतात. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सूर्य संक्रमण फायदेशीर सिद्ध होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना सूर्य संक्रमणाचा लाभ मिळेल.
 
वृश्चिक- सूर्य भ्रमणामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. वृश्चिक राशीचा प्रमुख ग्रह मंगळ आहे. मंगळ आणि सूर्य यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे सूर्याचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुमची कौटुंबिक प्रतिमा सुधारेल. भागीदारीत नवीन कामही सुरू करू शकता.
 
धनु - तुमच्या कुंडलीच्या दुसऱ्या घरात सूर्याचे भ्रमण होईल. या काळात तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. यादरम्यान संपत्तीचे योगही तयार होत आहेत. आर्थिक स्थिती सुधारेल. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढू शकते.
 
या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दरवर्षी मकर संक्रांतीला या मंदिरात घडतात आश्चर्यकारक चमत्कार, जाणून व्हाल थक्क