Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षणासाठी २१ वर्षीय युवकानं मृत्यूला कवटाळलं

suicide
, बुधवार, 25 ऑक्टोबर 2023 (21:07 IST)
सध्या राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सरकारदेखील मराठा आरक्षणाविषयी सकारात्मक असून कोणी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. तरीही तरूण आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. अशातच बीड मधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 
बीडमधील शहाजानपूर लोणी गावात एका २१ वर्षीय मराठा तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. अशोक मते असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या का करत आहोत, याचे कारण त्याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सांगितलं.
 
 अशोक मते याने स्वतःच्या शेतात आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी झाडावरून मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर त्यांना अशोकच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यात सरकार मराठा आरक्षण देत नाही, त्यामुळे आत्महत्या करत असल्याचा मजकूर लिहिला होता. याविषयीची माहिती नातेवाईकांनी दिलीय. मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
 
खिशामध्ये चिठ्ठी सापडली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. तपासाचा भाग असल्याने चिठ्ठीमध्ये काय आहे? हे सांगू शकत नाही, असं पिंपळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश भारती यांनी सांगितले. अशोक मते याच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्टार्टअप इनक्यूबेटर्सच्या १५ व्या वार्षिक परिषदेचे मुंबईत २६ ते २८ ऑक्टोबरदरम्यान आयोजन