Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Maratha Reservation: आरक्षणावर बागेश्वर बाबांचे विधान

Bageshwar Baba maratha aarakshan
, मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (12:11 IST)
Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri On Maratha Reservation: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण लढ्याचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा मुदत दिली असून, आरक्षण मिळायलाच हवे, अशी ठाम भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणप्रश्नी आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
 
अशावेळी बागेश्वर धाम बाबा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची टिप्पणी केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बागेश्वर धाम बाबांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बागेश्वर धाम बाबा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी मराठा आरक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, मला मनातील गोष्ट वाचता येणे हा एक वेगळा विषय आहे. अधिकारांची गोष्ट करणे, हा एक वेगळा विषय आहे. भारत जेव्हा संकटात होता, तेव्हा आपल्या शौर्याने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या जमातीला आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. 
 
पुढे ते म्हणाले की  सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला.दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान तुम्ही स्वीकारत नाही असा आरोप होत आहे, असे विचारले असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, कोणतेही प्रश्न, वादविवाद हे मीडियात बोलून सुटत नाहीत. तुमचे कुठे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. माझ्याबाबतीत तुम्हाला काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या, हेच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chhatisgarh elections : मतदानापूर्वी सुकमा येथे IED स्फोट, CRPF निरीक्षक जखमी