राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लावावा अशीही आग्रही मागणी होते आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एमआयएम या पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणावर या सगळ्यांची काय भूमिका आहे हे जाणून घेतले जाणार आहे. तसेच या बैठकीत या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याचीही चर्चा केली जाणार आहे. काकासाहेब शिंदे या तरूणाचा नदीत पडून मृत्यू झाला. त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्याच पार्श्वभूमीवर हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली आहे. विधान भवनात ही बैठक दुपारी २ वाजता होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.