Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, अंतरवाली सराटीकडे रवाना

manoj jarange
, शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:03 IST)
मराठा आरक्षणासाठी लढा तीव्र करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना उपचारांनंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे थेट अंतरवाली सराटी येथे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
 
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना आज, गुरुवारी छत्रपती संभाजीनगर शहरातील  एका खासगी रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्यानंतर जरांगे पाटील तात्काळ अंतरवाली सराटीच्या दिशेने रवाना झाले आहेत.
 
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडकणार असल्याचा इशारा सरकारला दिला आहे. अंतरवाली सराटी येथून ते मुंबईकडे पायी निघणार आहेत.
 
20 जानेवारी 2024 रोजी निघणाऱ्या पायी दिंडीच्या नियोजनासाठी अंतरवाली सराटीला गेले असून, तिथे ते पुढील नियोजन करतील. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये झालेल्या सभेनंतर ते शहरातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईतील चार जागांवर उद्धव गट निवडणूक लढवणार