Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मनोज जरांगे पाटीलांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरु

मनोज जरांगे पाटीलांचे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण सुरु
, रविवार, 21 जुलै 2024 (14:20 IST)
मराठा आरक्षणाला लढा देणार मनोज जरांगे पाटील शनिवारपासून पुन्हा बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहे. सगेसोयरेंसह सरसकट मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हे उपोषण करत आहे. 

मराठा आरक्षणाबाबत अद्याप राज्य सरकार ठोस निर्णय घेत नसल्याने मनोज जरांगे हे आक्रमक आहे. 
शनिवारी सकाळी 10 वाजे पासून ते अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले आहे. त्यांनी उपोषणापूर्वी शांतता रॅली काढली. 

सरकार ने मागण्या मान्य केल्या नाही म्हणून पुन्हा उपोषणाला बसलो आहोत असे ते म्हणाले. त्यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर टीका केली. तर मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. 

राज्य सरकार ने सगेसोयरेची अंमलबजावणी करून मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे आणि तीन ही गॅझेट लागू करण्याची मागणी करत पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. सध्या शेतीचे काम असल्याने कोणीही उपोषणाला येऊ नये असे आवाहन त्यांनी केले. 
 
Edited by - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अयोध्याचे खासदार अवधेश प्रसाद आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट