पंढरपूर ते मुंबई पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकारने मराठा समाजाने एखादा हाक दिली. सरकारने किती दबाव टाकला तरी माघार घेणार नसल्याचे सकल मराठा समाज समन्वयक धनंजय साखळकर यांनी सांगितले.
श्री विठ्ठलाच्या नामदेव पायरीचे दर्शन घेऊन ७ नोव्हेंबरपासून मराठा समाजाला आरक्षण पायी दिंडी मोर्चास सुरुवात होणार आहे. या मोर्चाबाबत माहिती मराठा मोर्चाचे समाज समन्वयक धनाजी साखळकर पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महेश डोंगरे, दीपक वादडेकर, किरण घाडगे, संदीप मांडवे, स्वागत कदम, सतीश शिंदे, अर्जुन चव्हाण, संदीप मुटकुळे उपस्थित होते.
पुढे साखळकर म्हणाले, कर्नाटक राज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आरक्षणासाठी करण्यात आलेल्या आंदोलना दरम्यान मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले यावे असे धनंजय साखळकर यांनी सांगितले.
आरक्षण मिळवण्यासाठी शहीद झालेल्या बांधवांना १० लाख रुपये मिळाले नाही ते देण्यात यावे. महाराष्ट्र राज्य महामंडळात नोकरी देखील देण्याचे आश्वासन पूर्ण करावे. राज्य सरकार गांभर्याने घ्यावा. केंद्र व राज्य सरकारने समन्वयाने प्रश्न सोडवावा असे आवाहन सकल मराठा समाज समन्वयक महेश डोंगरे यांनी केले.