Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही : मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil
, सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (20:29 IST)
राज्यात सध्या मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.  मंत्री छगन भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न झाली. या सभे आधी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा भुजबळांवर हल्लाबोल करत त्यांना इशारा दिला...
 
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, "छगन भुजबळ माझ्या एकट्याच्या विरोधात बोलतात, म्हणून आम्ही बोललो. आता ते म्हणतात की, मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, आम्हाला तेच पाहिजे होते. विनाकारण कोणाला टार्गेट करण्याचा माझा धंदा नाही. तसेही आरक्षण देऊ नका, असे बोलणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कुणी मराठा आरक्षणाला विरोध केला तर सोडणार नाही, मग तो कुणीही असो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
 
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "छगन भुजबळ यांनी स्वतः सांगितले पाहिजे, गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू द्या. कारण छगन भुजबळ यांना पाच मराठ्यांनी तरी मदत केली, त्याची थोडीशी जाण ठेवून तरी गोरगरीब मराठ्याना आरक्षण द्या, असे म्हटले पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना मदत करणारा सगळा मराठा समाज त्यांच्यावर नाराज होत आहे. ते इतका मराठा समाजाचा द्वेष का करतात, यासाठी मराठा समाजाने त्यांना मोठे केले का? छगन भुजबळ उच्च दर्जाचे सर्वात मोठे नेते आहेत, आम्ही कधी त्यांना तुम्ही वेगळ्या जातीचे आहेत. आमच्या बाप जाद्याने एकदा तरी त्यांना मदत केली असेल. आम्हीही ओबीसीत आहे, तुम्ही तुमचं खा, आम्हाला आमचे मिळू द्या, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
 

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वागतासाठी फुलांची उधळण करताना अपघात, 4 कार्यकर्ते खाली पडून गंभीर जखमी