मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले होते. त्यांनी पुकारलेल्या या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच या आंदोलनाचे पडसाद देखील दिसले. सध्या इयत्ता बारावीचे सहामाही पेपर सुरु आहे. मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इयत्ता बारावीच्या राज्यशास्त्राच्या पेपरच्या उत्तरपत्रिकेत चक्क एक मराठा कोटी मराठा असे लिहिले. या विद्यार्थ्याने पेपर सोडवण्याच्या पूर्वी असे लिहिले. संकेत लक्ष्मण साखरे (19) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
हा प्रकार बी.बी . दारफळ तालुका उत्तर सोलापूर च्या श्री गणेश विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीची सहामाही परीक्षा सुरु आहे. या महाविद्यालयात संकेत बारावीत शिकतो. त्याने राज्यशास्त्राचा पेपर सोडवताना उत्तरपुस्तिकेत 'जय शिवराय, जय जिजाऊ , जय शंभूराजे, एक मराठा कोटी मराठा असे लिहिले आहे. त्याची ही उत्तर पुस्तिका सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.