Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांनो, लागा परीक्षेच्या तयारीला! महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

Maharashtra Board
, बुधवार, 1 नोव्हेंबर 2023 (21:36 IST)
मुंबई :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. तर, दहावीची लेखी परीक्षा 1 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे.
 
फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10 वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिली आहे.
 
इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी, 2024  ते गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 व इयत्ता 12 वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी, 2024 ते मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
 
विद्यार्थी आणि पालकांनो ही बाब लक्षात असू द्या!
या कालावधीमध्ये आयोजित केलेले दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.in संकेतस्थळावर दिनांक 2 नोव्हेंबर 2023 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  
 
मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त जाहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार असल्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिध्द झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहनदेखील महाराष्ट्र शिक्षण मंडळाने केले आहे.




Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

क्रिकेटचा देव सचिनच्या शिरपेचात मानाचा तुरा, वानखेडेमध्ये सचिनच्या पुतळ्याचं अनावरण!