मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू असून मनोज जरांगे यांचा चौथा टप्पा आजपासून सुरु झाला असून आज 1 डिसेंबर रोजी त्यांची भव्यसभा जालनात होणार आहे. जालनाच्या मोंढा परिसरात त्यांचं जंगी भाषण होणार आहे. 40 एकराच्या या मैदानावर जरांगे पाटीलांची भव्य सभा होणार असून या भाषणाला गर्दी होण्याची शक्यता आहे.
पार्किंगसाठी 100 एकर जागेवर सोय करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटीलांच्या चौथ्या टप्प्यात नांदेड येथे सभा होणार, या दौऱ्यात त्यांच्या एकूण तीन सभा होणार आहे. या दौऱ्यातील सर्वात मोठी सभा वाडीपाटी येथे होणार असून 111 एकरच्या मोठ्या मैदानात ही सभा होणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसले होते. ओबीसी हे प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या मागणीला ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांचा विरोध आहे. या मुळे भुजबळ आणि जरांगे पाटीलांमध्ये वाद सुरु आहे. दोघे एकमेकांवर टीका करत आहे. जरांगे पाटीलांनी भुजबळ यांच्यावर सभेतून हल्ला बोल केला तर. भुजबळ यांनी ओबीसीची सभा घेत जरांगे पाटीलांना सडेतोड उत्तर दिले. आज जालन्यात होणाऱ्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जरांगे पाटील यांचा दौऱ्याचा पाचवा टप्पा कोकणात असणार.