Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मंत्री भुजबळांनी राजीनामा देऊन मराठा आरक्षणावर बोलावे

vivek patil
, गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (08:13 IST)
कोल्हापूरमराठा विरुद्ध ओबीसी असा सुरु असलेला वाद निरर्थक आहे. ओबीसीचा मुद्दा पुढे करुन आंदोलन करण्याची काही गरज नाही. कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भुमिका सरकारची नाही. तरीही मंत्री छगन भुजबळ राज्यात जातीय तेढ निर्माण होईल अशी विधाने करत आहेत. त्यांच्या या विधानांमुळे राज्यातील महायुती सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचा संदेश राज्याभर जात आहे. त्यामुळे मंत्री भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देवून मराठा आरक्षणावर बोलावे, असे वक्तव्य महसूल व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
 
मंत्री विखे-पाटील मंगळवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांना मराठा आरक्षणाबाबत विचारले असता, त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या टिका करत त्यांच्या भुमिकेवर आक्षेप घेतला.
 
मंत्री विखे-पाटील म्हणाले, कोणत्याही समाजाचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरु आहे त्या पार्श्वभूमीवर शासनाने आपली भुमिका स्पष्ट केली पाहिजे. मंत्री भुजबळ आज ज्या पद्धतीने मराठा व ओबीसी आरक्षणाबाबत वक्तव्य करत आहेत, त्यावरुन राज्यात जातीय तेढ निर्माण होण्याची भिती आहे. मंत्री भुजबळ यांच्यासारख्या नेत्याकडून अशी अपेक्षा नसल्याची टिका मंत्री विखे-पाटील यांनी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीस पेटविणार्‍या आरोपीस कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा