Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीस पेटविणार्‍या आरोपीस कोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा

jail
, बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (20:51 IST)
नाशिक :- दुसरा विवाह करण्याच्या नावाखाली पत्नीचा छळ करून तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून देत आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्‍या आरोपीस भा. दं. वि. कलम 307 अन्वये आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे
 
याबाबत माहिती अशी, की सिडकोतील राजविहार हॉटेलच्या मागे राहणारा आरोपी प्रकाश काशीनाथ पाटोळे (वय 37) हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा छळ करीत असे. याअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी 2013 रोजी सकाळच्या वेळेस झालेल्या भांडणात आरोपी पत्नीचे तोंड दाबून तिच्यावर रॉकेल व पेटती काडी टाकून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी भा. दं. वि. कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला होता.
 
त्याचा पुढील तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. एन. गावित यांनी करून खटला कोर्टात पाठविला. या खटल्याचे कामकाज जिल्हा न्यायाधीश-1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती मृदुला भाटिया यांच्या कोर्टात चालले. न्यायालयाने आरोपीस परिस्थितीजन्य पुराव्यानुसार भा. दं. वि. कलम 307 अन्वये आजीवन सश्रम कारावास व एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
 
या खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती रेश्मा जाधव यांनी कामकाज पाहिले. गुन्हा शाबित होऊन आरोपीस शिक्षा लागण्याइतका योग्य तपास केल्याबद्दल संबंधित पोलीस उपनिरीक्षक पैरवी अधिकारी व अन्य संबंधितांचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनमाडमधील इंदोर-पुणे महामार्गावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचा कठडा खचला