Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीर भूमीत मराठा क्रांती मोर्चा

वीर भूमीत मराठा क्रांती मोर्चा
, सोमवार, 3 ऑक्टोबर 2016 (17:41 IST)
महारष्ट्रातील सर्वाधिक जवान ज्या सातारा या जिल्ह्याने देशाने दिले त्या विरभूमीत  काढण्यात आलेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाला लाखोंच्या संख्येने मराठा नागरिक सहभागी झाले होते. तर आह दुपारी  या मोर्चाची सांगता झाली आहे. यावेळी मोर्चातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या मोर्चाचा समारोप झाला. सातारा येथील लाखो नागरिकांची उपस्थित अत्यंत शिस्तबद्ध मोर्चा काढला होता..विशेष म्हणजे रस्त्यांवर प्रचंड गर्दी असतानाही एका रुग्णवाहिलेला मोचोतून काही मिनिटांता वाट करून देण्यात आली. यावरूनच या मोर्चाची शिस्त लक्षात येते. 
 
या मोर्चात संपूर्ण जिल्ह्यातून लाखो मराठा बांधव सातारा शहरात आले होते. पवई नाका येथून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. 
 
छत्रपती शिवाजी महाराजचे 13 वंशज खा. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हेही या मोर्चात सहभागी झाले . त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री विजय शिवतरेही सातार्‍याच्या मोर्चात सहभागी होते. ‘कोपर्डी’ घटनेतील नराधमांना कठोर शासन व्हावे, मराठा समाजाला आरक्षण, अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमच्यावर अन्याय बहुजन संघटना