Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रामचंद्रांची आरती Shriram Aarti Marathi

ram aarti
, शुक्रवार, 24 मार्च 2023 (14:27 IST)
रामचंद्राचीं आरती - अवतरला रघुपती जे 
अवतरला रघुपती जे । आनंदली वसुधा ते ॥
गंधर्व वनिता माध्यान्ह समयी ।
मंगल घोषे नाचति थैथै ॥ धृ. ॥
अमृतकल्या वल्या ।
चांफेकळ्या त्या फुलल्या ॥
प्रसृत झाली श्रीकौसल्या ।
सरिता वाहे अमृततुल्या ॥ अवतरला ॥ १ ॥
वाजंत्रांचे जोड ।वाजती द्वारापुढे ॥
अंगणिं कुंकुंमकेशरि सडे ।
गुढीया मखरें चहूंकडे ॥ अवतरला ॥ २ ॥
क्षीराब्धीसम वाडे सुरतरुचीं फुलझाडे ।
अरुंधती बाळंतिणीकडे धांटीतसे हो बोळवीडे ॥ अवतरला ॥ ३ ॥
देवाधर्मासाठीं । कितीं सोसू काटाटी ॥
मुक्तीचे मस्तकि देऊन पाटी ।
मध्वमूनीश्वर साखर वांटी ॥ अवतरला ॥ ४ ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Chaitra Navratri 2023:चैत्र नवरात्रीचे महत्त्व जाणून घ्या