Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

आरती काळभैरवाची
आरती ओवाळू भावे, काळभैरवाला ।।
दीनदयाळा  भक्तवत्सला, प्रसन्न हो मजला ।।
देवा,  प्रसन्न हो मजला ।।धृ।।
धन्य तुझा अवतार जगीं या, रौद्ररूपधारी ।
उग्र भयंकर भव्य मूर्ती परि, भक्तासी तारी ।
काशीक्षेत्री नास तुझा तूं, तिथला अधिकारी ।
तुझिया नामस्मरणे पळती, पिशाच्चादि भारी ।।
पळती, पिशाच्चादि भारी ।।आरती...।।1।।
उपासकां वरदायक होसी, ऐसी तव किर्ती ।
क्षुद्र जीवा मी अपराध्यांना, माझ्या नच गणती ।
क्षमा करावी कृपा असावी, सदैव मजवरती ।
मिलिंदमाधव म्हणे देवा, घडो तुझी भक्ती ।।
देवा, घडो तुझी भक्ती ।।आरती...।।2।।

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Kaal Bhairav ​​Jayanti 2025 कालभैरव जयंती का साजरी केली जाते? पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या