कांकडे आरती तुजला जगदंबे शांते, तुजला जगदंबे शांते।
महाकाली-महालक्ष्मी जय सरस्वती माते ॥ धृ. ॥
मधुकैटभमर्दिनी शुंभनिशुंभ निर्दालिनी ।
अघनगसंहारिणी दयाले-सुर-मुनि-परि-पालिनी ।। काकडे आरती ।। 1।।
महिषासुरमर्दिनी भवानी चंडमुंडघातिनी ।
चिच्छक्ते चिन्मात्रे चित्तचालक
नारायणी ।। काकडे आरती ।। 2 ।।
गोब्राह्मण छळितांचि कलियुगी दैत्यांशी यवनीं ।
तूंचि करिसी नि:पात तयांचा शिवनृप- वरदायिनी ।। काकडे ।। 3 ।।
धर्मग्लानी दैन्य दु:खही दूर कराया झणी ।
नानारुपी अवतरसी तूं ताराया अवनी ।।
काकडे आरती ।। 4 ।।
शत्रुबुद्धिसी मोह, सन्मती पसरविं अमुच्या जनीं ।
निजपदकमली रमविं भवानीदास
रात्रंदिनी काकडे आरती ।। 5 ।।
श्रीजगदंब । जगदंब । जगदंब । उदयोस्तु ।