rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Capricorn
2018 हे असे वर्ष आहे, ज्या वर्षात तुम्हाला आयुष्य म्हणजे नक्की काय, याची जाणीव होईल. एकीकडे तुमचा खर्च प्रमाणापेक्षा अधिक होईल आणि तुमची आर्थिक स्थिती खालावत असल्याची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 2018 सालातील भविष्य सांगते की, तुमचा कल अध्यात्माकडे राहील आणि भौतिक जगापासून काही काळ दूर जाल.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
webdunia
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
तुमचे काही परदेशी संबंध निर्माण होतील आणि त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिकार प्राप्त होईल आणि तुम्हाला काही नवी कामे आणि महत्त्वाचे प्रकल्प मिळतील. व्यवसाय आणि धंद्याच्या क्षेत्रात वाढती स्पर्धा आणि उत्पन्नात म्हणावी, तशी वाढ होण्यासाठी काही वेगळे नियोजन कराल. नवीन ओळखीतून रेंगाळलेली कामे गती घेतील. मार्च ते जुलै या काळात उत्पन्न वाढेल. एखादा नवीन जोडधंदा सुरू करण्याचा मानस राहील. प्रतिष्ठित व्यक्तींकडून ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंत उत्तम साथ मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र अतिपैशाचा मोह धरू नका. नोकरीच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी तुमच्यावर येऊन पडण्याची शक्यता आहे. परंतु त्यामुळे तुमची दगदग, धावपळ प्रचंड प्रमाणात वाढेल. प्रकल्पाकरिता तुमची निवड होईल. 
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
webdunia
गृहसौख्य व आरोग्यमान... 
कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने मात्र वर्ष फारसे सौख्यकारक नाही. राशीमधला शनी तुम्हाला तुमच्या नैतिक जबाबदार्‍यांमध्ये जखडून ठेवेल. विद्यार्थ्यांची कामगिरी समाधानकारक राहील आणि त्यांना शिक्षणाकडे ओढा वाढेल व ते नव्या गोष्टी शिकतील. कौटुंबिक आयुष्य समृद्ध होईल आणि तुमच्या नात्याची वीण अधिक घट्ट होईल. सांसारिक जीवनामध्ये काही मोठे बदल या वर्षात संभवतात. कदाचित त्याला तुमचे करिअर जबाबदार असेल. काही जणांना अधिक पैसे  मिळविण्याकरिता दुसर्‍या देशामध्ये स्थायिक जावेसे वाटेल. मुलांची शिक्षणामधील प्रगती चांगली राहील. त्याच्याकरिता तुम्हाला वेगळे पैसे काढून ठेवावे लागणार आहे. तरुणांचे विवाह जमतील. पण त्यामध्ये स्थिरता मिळायला थोडा जास्त अवधी द्यावा लागेल. ज्यांना रक्तदाब किंवा हाडांचे विकार आहेत त्यांनी या वर्षात अती दगदग करू नये. क्रीडा, सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना बरेच चढउतार अनुभवावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुंभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल