या वर्षी आपले आरोग्य कमकुवत होण्याची शक्यता दिसत आहे. त्याचे कारण अती तणाव. या वर्षाच्या सुरुवातीस आपले आरोग्य चांगले राहणार आहे. आपण अतिउत्साही असाल. शारीरिक मानसिक दृष्टीने स्वस्थ राहाल.
या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरा जावं लागेल. साथीचे आजार, अपचन, सांधेदुखी, डोकेदुखी, कांजण्या आणि शरीर दुखणे यासारख्या समस्यांना सामोरी जावे लागू शकतं. निष्काळजीपणा आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतो.
किरकोळ आरोग्याच्या तक्रारी कडे आवर्जून लक्ष द्या आणि वेळेतच वैद्यकीय सल्ला घ्या. योग, ध्यान, व्यायाम नियमितपणे करा. हे वर्ष आपणास तणाव घेणे टाळावे लागेल कारण हेच आपल्या आरोग्याच्या समस्यांचे मूळ कारण असेल. या वर्षात किरकोळच त्रासाला सामोरा जावं लागेल. त्या सोडल्या तर कोणतीही मोठी समस्या आढळून येण्याची शक्यता नाहीशी आहे.
या वर्षाचा उत्तरार्ध आपल्यासाठी खूप चांगला सिद्ध होऊ शकतो कारण या काळात आपल्याला आरोग्याच्या तक्रारींपासून मुक्तता मिळेल आणि सर्व दृष्टीने आनंददायक वाटेल.