Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Love Horoscope 2020 प्रेम राशिभविष्य: धनू

webdunia
  • facebook
  • twitter
  • whatsapp
share
बुधवार, 4 डिसेंबर 2019 (17:28 IST)
धनू राशीच्या जातकांसाठी हे वर्ष प्रेमच्या बाबतीत आनंद देणारे सिद्ध होईल आणि आपण आपल्या पार्टनरसोबत छान वेळ घालवाल. आपल्या प्रेमात अजून गोडवा निर्माण होईल आणि आपण एकमेकांप्रती समर्पित होऊन एकमेकांच्या गोष्टी ऐकाल, समजाल आणि जीवनात अमलात आणण्याचा प्रयत्न कराल. खरं तर आपली हीच प्रवृत्ती आपल्याला महान करते आणि याच कारणामुळे पार्टनर आपल्यापासून दूर होण्याचा विचार देखील करू शकतं नाही. 
 
तरी आपल्याला आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवावे लागेल नाहीतर स्थिती उलट देखील होऊ शकते. आपण प्रेम जीवनात असताना आपण एकटे नाही आपण कोणाच्यासोबत आहात हे लक्षात ठेवून समोरचा आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा असल्याची जाणीव करून द्या.
 
आपल्याला ईमानदार असून साथीप्रती पूर्णपणे समर्पित असलं पाहिजे. वर्षाच्या मध्य काळात आपल्या प्रेम जीवनात रोमांसचा प्रभाव असू शकतो. आपल्यातील आकर्षण अधिकच वाढेल आणि प्रेम जीवन बहरून जाईल. काही लोकांना या वर्षी प्रेम विवाह करण्यात यश मिळू शकतं. अशा लोकांना जानेवारी ते मार्च आणि जुलै ते नोव्हेंबर पर्यंत ही संधी मिळू शकते. 
 
वर्षाच्या शेवटी आपल्याला प्रेम जीवनात भविष्याबद्दलद महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासेल तेव्हा आपल्याला हृद्याची हाक ऐका. आपण आधीपासून रिलेशनमध्ये असाल तर या दरम्यान आपलं नातं मजबूत होईल आणि आपण सिंगल असाल तर आपल्याकडे कोणी आकर्षित होत असल्याची जाणीव होईल.

Share this Story:
  • facebook
  • twitter
  • whatsapp

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

webdunia
Love Horoscopes 2020 प्रेम राशिभविष्य: वृश्चिक