Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

त्वचेचे पुरळ व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे येऊ शकतात

BEAUTY TIPS  BEAUTY CARE TIPS  IN MARATHI SKIN RASHES CAN BE SIGNS OF VITAMIN C Deficiency take orange peel tea ORANGE PEEL TEA EFFACTIVE ORANGE PEEL TEA HOW TO MAKE ORANGE PEEL TEA IN MARATHI WEBDUNIA MARATHI
, सोमवार, 8 मार्च 2021 (19:17 IST)
शरीराला दररोज पोषक घटक आवश्यक असतात, प्रथिने खनिजे आणि जीवन सत्वे समृद्ध असलेले अन्न रोजच्या आहारात समाविष्ट केले जातात. 
व्हिटॅमिन सी देखील आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे जीवनसत्त्व शरीरातील संसर्ग मुक्त करण्यासाठी आणि ऊर्जा सम्प्रेषित करण्यासाठी उपयुक्त भूमिका बजावते.  
बऱ्याच वेळा अस्वस्थ खाण्यापिण्यामुळे आणि आनुवंशिक कारणांमुळे  देखील शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता दिसून येते. या मुळे संक्रमण होण्याचा धोका होतो.त्वचा कोरडी होते,सुरकुत्या येतात.या शिवाय ताप, दृष्टी कमी होणे, हिरड्यांना सूज येते,चेहऱ्यावर लाल पुरळ होते,या समस्या उद्भवतात. या साठी संत्र्याच्या साला पासून बनलेला चहा व्हिटॅमिनसी ची कमतरता दूर करतो.चला तर मग जाणून घेऊ या. संत्र्याच्या सालीच्या चहाच्या सेवनाचे फायदे. 
 
या सालीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतो. हे पाचक प्रणाली सुधारतो, कर्करोगाचा धोका कमी करतो आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. हे कसे प्यावं कृती जाणून घेऊ या. 
 
कृती -
एका भांड्यात थोडं पाणी घ्या आणि मंद गॅसवर उकळवा.त्यामध्ये संत्रीच्या सालासह अर्धा इंच दालचिनी, 2ते 3 लवंगा,1 ते 2 वेलची मिसळून काही वेळ उकळवून घ्या. 10 मिनिटा नंतर एका कपात गाळून घ्या.गाळून चहा मध्ये अर्धा चमचा गूळ मिसळा नंतर त्याचे सेवन करा. हे आपण अनोश्यापोटी सकाळ किंवा संध्याकाळ देखील घेऊ शकता.   
हा चहा व्हिटॅमिन सी ने समृद्ध आहे. हा रोग प्रतिकारक शक्तीला वाढविण्याचे काम करतो.हा चहा छातीत जळजळ होणे, मळमळणे, सारखे त्रास दूर करतात. या मध्ये अँटी कर्करोगी गुणधर्म  असतात. संत्र्याच्या सालींमधे पॉलीफेनॅल आढळतो . या मुळे मधुमेह, लठ्ठपणा आणि अल्झायमर सारखे त्रास दूर करतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेसिपी - घरच्या घरी बनवा खमंग खुसखुशीत कांदा मठरी