Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी काही सोपे टिप्स

चमकदार त्वचा मिळविण्यासाठी काही सोपे टिप्स
, रविवार, 7 मार्च 2021 (08:30 IST)
चमकणाऱ्या त्वचेसाठी लोक बरेच उपाय करतात. सौंदर्य प्रसाधने देखील वापरतात. परंतु या सौंदर्य उत्पादनांचा जास्त वापर केल्याने त्वचेला नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत काही गोंष्टींचा वापर करून त्वचा चमकवू शकता चला तर मग जाणून घेऊ या. काय आहे त्या टिप्स. 
 
1 टोमॅटो-
टोमॅटो मध्ये त्वचेला चमकविण्याचे आणि ब्लीचिंगचे गुणधर्म आढळतात जे त्वचेचे डाग दूर करण्यासाठी सहाय्यक असतात. त्वचेला निरोगी बनविण्यासाठी दररोज टोमॅटोचे तुकडे करून आपल्या चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा धुऊन घ्या. 
 
2 बटाटा- 
या मध्ये देखील त्वचेला चमकविण्याचे आणि ब्लीचिंगचे गुणधर्म आढळतात.दररोज बटाटा चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात. या साठी बटाटा डाग असलेल्या भागावर चोळा. 5 मिनिटे चोळल्यावर पाण्याने स्वच्छ धुऊन मॉइश्चरायझर लावून धुऊन घ्या. 
 
3 पपई - 
पपईमध्ये पेपेन आढळते जे एंझाइम स्किन लायटनिंग एजेंट प्रमाणे काम करते. पपईचा वापर केल्याने त्वचा उजळते. त्वचेला निरोगी बनविण्यासाठी एक पिकलेली पपई घेऊन त्याचे तीन छोटे-छोटे तुकडे करून मॅश करून घ्या या मध्ये एक चमचा गुलाब पाणी मिसळा आणि पेस्ट बनवा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट कोरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. 
 
4 हळद-
हळद ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्वचेमध्ये चमक आणण्यासाठी एक चतुर्थांश वाटीत कच्च्या दुधात अर्धा लहान चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि  5 मिनिटा नंतर चेहरा धुऊन घ्या.  
 
टीप: दररोज रात्री या टिप्स अवलंबवा. या मुळे त्वचेवर चांगला परिणाम होईल. त्वचा उजळून निघेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉन्ग डिस्टन्स नात्यात या चुका होऊ शकतात, अशी काळजी घ्या