सरत्या वयात देखील चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी त्वचेची काळजी घ्यावी लागते.उन्हाळ्यात कलिंगड खाल्ल्याने थंडावा मिळतो.तर याचे फेस पॅक बनवून चेहऱ्यावर लावल्याने फायदेशीर असत.चला 40 च्या वयात 25 वर्षाचे सौंदर्य मिळविण्यासाठी कलिंगडाचे फेस पॅक कसे बनवायचे जाणून घ्या.
1 कलिंगडाचे पॅक बनविण्यासाठी कलिंगडाचा पांढरा भाग काढून त्यात थोडंसं मध मिसळून चेहऱ्यावर लावा.
2 हे पॅक कोरडे झाल्यावर पुन्हा चेहऱ्यावर लावा.असं 10 ते 15 मिनिटा पर्यंत करा.
3 आपली इच्छा असल्यास या रसात कापूस भिजवून चेहऱ्यावर पसरवून द्या.नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.
4 या मुळे आपली त्वचा मऊ आणि कोवळी होते.आणि त्वचेवरील डाग देखील कमी होतात.
5 कलिंगड हे भाजलेल्या त्वचेचे डाग काढून टाकण्यासाठी देखील फायदेशीर आहे.