Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Beauty Benefits of Ice Cube: चेहऱ्यावर बर्फाची मॉलिश केल्याचे फायदे जाणून घ्या

Beauty Benefits of Ice Cube: चेहऱ्यावर बर्फाची मॉलिश केल्याचे फायदे जाणून घ्या
, शनिवार, 3 जुलै 2021 (08:30 IST)
उन्हाळ्याच्या मौसमात त्वचेची उष्णता वाढते,पुळ्या,मुरूम होण्या सारख्या समस्या उद्भवतात.या हंगामात चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाची मॉलिश करणे प्रभावी ठरू शकते.
या साठी आपल्याला बर्फाला एखाद्या कपड्यात किंवा प्लास्टिकच्या बॅगेत गुंडाळून चेहऱ्यावर लावायचे आहे.चला जाणून घेऊ या की चेहऱ्यावर दररोज 10 मिनिटाची मॉलिश केल्याने काय फायदे मिळतात.
 
1  बर्फाची मॉलिश केल्याने मुरुमांपासून सुटका मिळते.सर्वप्रथम आपला चेहरा धुवून कोरडा करा.आता कपड्यात किंवा प्लास्टिक बॅगेत गुंडाळलेल्या बर्फाने आपल्या हाताला वर्तुळाकार फिरवत चेहऱ्याची 10 मिनिटे मॉलिश करा.असं दररोज केल्याने मुरुमांपासून सुटका मिळते.
 
2 शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असल्यास त्यात ही आराम मिळतो.
 
3 चेहऱ्यावर मेकअप करण्याच्या पूर्वी जर चेहऱ्याची बर्फाने मॉलिश केली तर हे प्रायमरचे काम करतो.आणि आपले मेकअप जास्तकाळ टिकेल.
 
4 बर्फाची मॉलिश केल्याने रक्तविसरण चांगले होत,या मुळे आपण दीर्घकाळापर्यंत तरुण दिसाल.
 
5 सनबर्न किंवा त्वचेची टॅनिग झाली असल्यास टॅनिग काढून टाकण्यात बर्फाची मॉलिश केल्याने मदत होते.
 
6 कॉम्प्युटर किंवा मोबाईलचा सतत वापर केल्याने डोळे सुजतात.डोळ्याची सूज घालविण्यासाठी डोळ्यांवर बर्फाची मॉलिश करा,असं केल्याने डोळ्याला थंडावा मिळेल आणि आपल्याला फ्रेश वाटेल.डोळ्याचा थकवा देखील दूर होईल.
 
7 बर्फाने चेहऱ्यावर मॉलिश नियमितपणे केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या देखील लवकर पडत नाही.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाच्या ओलसरपणामुळे येणारा दमट वास दूर करण्यासाठी हे अवलंबवा