Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉस्मेटिक सर्जरी करण्यापूर्वी हे वाचा...

कॉस्मेटिक सर्जरी करण्यापूर्वी हे वाचा...
कॉस्मेटिक सर्जरी हा शस्त्रक्रियेद्वारे केला जाणारा असा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीमध्ये बदल केले जातात. आजकाल प्रत्येकाला आकर्षक दिसायचं असतं. नैसर्गिक बेढव शरीर सुडौल बनवण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतली जाते.

या प्रक्रियेतला सर्वज्ञात असलेला प्रकार म्हणजे लिपोसक्शन यामध्ये शरीरातील अतिरिक्त फॅट शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढलं जातं. फेस लिफ्ट या प्रकारामध्ये बोटॉक्स नावाचं औषध सिरिंजद्वारे देऊन चेहर्‍याच्या पेशींमध्ये लवचिकता आणली जाते. या लवचिकतेमुळे चेहर्‍यावरच्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. या सर्जरीद्वारे ओठांचा आकारही बदलत येणं शक्य आहे.
 
कॉस्मेटिक सर्जरीद्वारे तुम्ही आत्मविश्वास मिळवू शकता. कॉस्मेटिक सर्जरी शरीरातील विशिष्ट अवयवासंबंधी असलेला न्युनगंड दूर करण्यास सहायक ठरते.
 
बरेचदा कॉस्मेटिक सर्जरी शरीराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी गरजेची असते. ब्लेफरोप्लास्टीसारखी सर्जरी डोळ्यांची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.
 
कॉस्मेटिक सर्जरी अत्यंत महागड्या असतात. त्यामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवक्याच्या बाहेर असतात.
 
कॉस्मेटिक सर्जरीमध्ये रूग्णाला एका सेशननंतर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक सेशन्सना तोंड द्यावं लागू शकतं.
 
सर्जरीनंतर रूग्ण लगेचच दैनंदिन कामांना सुरूवात करू शकत नाही. त्याला मोठ्या कालवधीसाठी विश्रांतीची गरज असते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नोकरदार महिलांना पुरूषांच्या तुलनेत अधिक ताण