लग्नकार्य असो किंवा सणवार, मेंदी रंगवली नाही तर चुकल्या सारख्या वाटतं. गडद रंगामध्ये रंगलेले मेंदीचे हात आणि त्याची सुंगध सणासुदीचा प्रसंग आणखी आनंदी करून देतं. आपल्यालाही अशी इच्छा असेल की आपल्या हातावरील मेंदीचा रंग उठून दिसला पाहिजे तर हे 10 सोपे उपाय अमलात आणा-
1 मेंदी लावण्यापूर्वी हात स्वच्छ करावे आणि नीलगिरी किंवा मेंदीचे तेल लावावे.
2 मेंदीला किमान 5 तास तरी हातावर लावून ठेवावे.
3 मेंदी हलकी-हलकी वाळल्यावर त्यावर लिंबू आणि साखरेचा घोळ लावावा. ज्याने मेंदी थोड्या वेळ चिकटून राहील.
4 मेंदी काढताना त्यावर पाणी लागू नये याची काळजी घ्यावी, अन्यथा मेंदी गडद रंगण्याची शक्यता कमी असते.
5 मेंदीचा रंग हलका वाटत असल्या त्यावर बाम, आयोडेक्स, विक्स किंवा मोहरीचे तेल लावावे. हे सर्व पदार्थ उष्णता प्रदान करतात आणि याने मेंदीचा रंग गडद होत जातो.
6 मेंदी लागलेल्या हातावर लवंगांचा धूर घेऊ शकता. यावर लोणच्याचे तेलही लावू शकतात.
7 मेंदी रंगविण्याचा एक पारंपरिक उपाय आहे चुना लावण्याचा. पाणी न मिसळता मेंदी लागलेल्या हातांवर चुना रगडण्याने मेंदीचा रंग गडद होतो.
8 मेंदी जरा वाळल्यावर हातांना रजईने झाकू शकता. रात्री मेंदी लावली असल्यास सर्वात उत्तम. त्यानंतर रजई पांघरून झोपून जावे. याने हातांना उष्णता मिळेल आणि रंग चढेल.
9 मेंदी को नैसर्गिक रूपाने वाळू द्यावी. मेंदी वाळवण्याची घाई केल्यास त्यावर रंग चढणार नाही.
10 कोणत्याही कार्यक्रमासाठी मेंदी लावायची असेल तर नियत तिथीच्या एक किंवा दोन दिवस आधी मेंदी लावायला हवी. ज्यानेकरून मेंदीला गडद रंग चढतो.