Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोज सकाळी प्यायच्या पाण्यात ह्या सहा वस्तू मिसळा आणि बघा कसा चमकेल तुमचा चेहरा

रोज सकाळी प्यायच्या पाण्यात ह्या सहा वस्तू मिसळा आणि बघा कसा चमकेल तुमचा चेहरा
, सोमवार, 4 मार्च 2019 (15:36 IST)
तुम्हाला असे वाटत आहे की तुमच्या चेहर्‍याची चमक फिकी पडत आहे, सर्व उपाय केल्यानंतर देखील चेहर्‍यावर तेज येत आही आहे? तर त्याचे मुख्य कारण असे ही असू शकते की तुम्ही दिवसभरात पर्याप्त मात्रेत पाण्याचे सेवन करत नसाल. डिहाइड्रेशनमुळे देखील चेहरा निस्तेज दिसतो. पाण्याचे सेवन केल्याने चेहरा हाइड्रेट असतो आणि  हाइड्रेटिंगचे स्किनला बरेच फायदे होतात. पण तुम्हाला असे वाटत असेल की चेहरा हाइड्रेट राहण्यासोबत एक्‍स्‍ट्रा ग्‍लो देखील करायला पाहिजे तर तुम्हाला रोज एक ग्लास पाण्यात हे मिसळून प्यायला पाहिजे.
 
चिया सीड :  चिया सीड आपल्या पोषक तत्त्वांमुळे सुपरफूडच्या श्रेणीत येतात. चिया सीड एंटी-ऑक्‍सीडेंट आणि ओमेगा 3 ने भरपूर असतात. जे की डल चेहर्‍याला निखरण्याचे काम करते. रोज याचे सेवन केल्याने चेहर्‍याची चमक वाढते.   
 
दालचिनी : प्यायच्या पाण्याला उकळताना त्यात चिमूटभर दालचिनी (कलमी) आणि एक तुकडा सफरचंदाचा टाकावा. नंतर त्या पाण्याला गाळून त्याचे सेवन करा. याची चव देखील चांगली येईल आणि शरीरातील रक्तसंचार देखील योग्य राहील. यामुळे तुमच्या चेहर्‍यात निखर येईल.   
 
स्ट्रॉबेरीचा रस : प्यायच्या पाण्यात स्ट्रॉबेरीचा रस मिसळून प्यायल्याने चेहर्‍याचे डाग दूर होतील. यात व्हिटॅमिन सी आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात.   
 
मध : सकाळी कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी होते. त्याशिवाय तुमच्या स्किनचे स्पॉट देखील गायब होण्यास मदत मिळते.   
 
पुदिन्याचे पाणी : पुदिन्याचे पाण्याने तुमचे पोट साफ होत आणि स्किनवर कुठल्याही प्रकारचे डाग राहत नाही. अशात जर तुम्ही रोज सकाळी पुदिन्याचे पाणी प्यायले तर तुमची स्किन नक्कीच ग्लोइंग करेल.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

का जरूरी आहे तुमच्या आहारात फायबर, 4 मोठ्या आरोग्याशी निगडित समस्येपासून दूर करतो