Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कढी पत्त्यामुळे केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा

कढी पत्त्यामुळे केसांच्या समस्येपासून मुक्ती मिळवा
भारतीय पक्वान्नांमध्ये कढी पत्त्याचा वापर फक्त फोडणी लावण्यासाठी केला जाता. याला 'गोड लिंबं'देखील म्हटले जाते. यात बर्‍याच प्रकारचे औषधीय गुण असतात. कढीपत्ते केसांना काळं करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्याच्या नियमित वापरानं आपल्या केसांमध्ये जीव येतो आणि ते काळे होऊ लागतात. केसांसाठी कढीपत्त्याचे आणखी फायदे आहेत. ते पाहून घेऊया...  
 
केसांचे गळणे कमी करणे : कढी पत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी1 बी3 बी9 आणि सी असतं. त्याशिवाय यात आयरन, कॅल्शियम आणि फॉस्फोरस असतं. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. एवढंच नव्हेतर हे केसांमध्ये असणार्‍या डैंड्रफ (कोंडा)पासून देखील बचाव करतो.    
 
कसा करावा कढी पत्त्याचा वापर 
 
1. कढी पत्त्याचे तेल : 
कढी पत्त्याचा एक गुच्छा घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन टाकावे आणि सूर्य प्रकाशात त्या पानांना वाळवून 
घ्यावे, जेव्हा हे पानं वाळून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एम एल नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये किमान 4 ते 5 चमचे कढी पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून द्यावा. तेलाला गाळून एखाद्या एअर टाइट बाटलीत भरून ठेवा. झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावायला पाहिजे. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येईल. दुसर्‍या दिवशी सकाळी डोक्याला फक्त नॅचरल शँपू लावून धुवावे. या ट्रीटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.  
 
webdunia
2. केसांसाठी तयार करावा मास्क : 
कढीपत्त्याची पानं बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस २०-२५ मिनिट तसेच ठेवा, नंतर शॅम्पूनं केस धुवा. असं नेहमी केल्यानं केस काळे आणि घनदाट होतात.   
 


3. कढीपत्त्याचा चहा तयार करा :
कढी पत्ता पाण्यात उकळून घ्या नंतर त्यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनवून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेल. तसेच केस पांढरे होण्यापासून वाचवेल आणि आपली डायडेस्टिव सिस्टमही स्वस्थ ठेवेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रोज डे : मन जोडणारे फुल!