तुम्ही कधी डाळिंबाच्या सालाच्या चहाबद्दल ऐकले आहे का?
हो, खरं आहे डाळिंबाच्या सालींचे देखील चहा तयार करू शकतो आणि त्याचे फायदे जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. या चहात उपस्थित बरेच महत्त्वपूर्ण एंटीऑक्सिडेंट्समुळे हे हृदय रोग, बर्याच प्रकारचे कँसरपासून बचाव करते आणि त्वचेवर वयाच्या प्रभावाला कमी करतो.
असे तयार करा डाळिंबाच्या सालीचा चहा
डाळिंबाच्या सालीचा चहा तयार करताना सर्वात आधी एका भांड्यात एक कप पाणी गरम करा. आता या पाण्यात एक चमचा डाळिंबाच्या सालीचे पूड घाला. थोड्या वेळ पावडरला पाण्यात तसेच ठेवा. नंतर याला कपात गाळून घ्या. चव वाढवण्यासाठी यात थोडंसं लिंबाचा रस आणि ऑर्गेनिक मध मिसळा.
या चहा चे फायदे
पचनासाठी फायदेशीर
डाळिंबाच्या सालीत उपस्थित बरेच एंटीऑक्सिडेंट्समुळे हा चहा फारच फायदेशीर असतो आणि बर्याच आजारांपासून शरीराचा बचाव करतो. जेवण झाल्यानंतर या चहाचे सेवन करणे उत्तम असते.
गळ्यात खरखर
जर तुमच्या गळ्यात खरखर असेल किंवा तुम्हाला टॉन्सिलचा त्रास असेल तर या चहाचे सेवन केले पाहिजे. यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल.
हृदयाच्या आजारांपासून बचाव
फ्लेवेनॉइड्स, फेनॉलिक्स सारखे एंटीऑक्सिडेंट्समुळे या चहाचे सेवन केल्याने हृदयाचे आजार कमी होण्याची आशंका असते. या चहाचे सेवन केल्याने तुमचे ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहत आणि शरीरातील बॅड कोलेस्टरॉलचा स्तर कमी होतो.
वयाचे प्रभाव कमी होण्यास मदत मिळते
चहात उपस्थित या एंटीऑक्सीडेंट्समुळे याचे सेवन केल्याने तुमच्यावर वयाचा प्रभाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या वयापेक्षा कमी दिसू लागता. हे एंटीऑक्सिडेंट्स फ्री रेडिकल्सला न्यूट्रिलाइज करतात, जसे सुरकुत्या व डोळ्याखालील काळेपणा दिसत नाही.
संधिवातात फायदेशीर
हा चहा प्यायल्याने संधी वात आणि हाडांच्या कमजोरीत फायदा मिळतो.
कँसरपासून बचाव
बर्याच शोधामध्ये ही बाब समोर आली आहे की डाळिंबाच्या सालांमध्ये बरेच तत्त्व उपस्थित असतात जे शरीरात कँसरच्या आशंकेला कमी करतो. याचा सर्वात जास्त फायदा स्किन कँसरमध्ये बघण्यात आला आहे.