Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दातांना चकचकीत करण्यासाठी या 5 फळांचे सेवन आवर्जून करा

दातांना चकचकीत करण्यासाठी या 5 फळांचे सेवन आवर्जून करा
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (18:45 IST)
पांढरे शुभ्र दात आपल्या सौंदर्याला वाढविण्याचे काम करतात.दातांचा पिवळटपणा दूर करण्यासाठी आपण सर्व उपाय करतो,डॉक्टर पासून घरगुती उपायांपर्यंत. परंतु ते काही करतच नाही जे करायला पाहिजे.दातांमध्ये पिवळटपणा अनेक कारणांमुळे असू शकतो. जसं की व्यवस्थित ब्रश न केल्यामुळे,औषधांची प्रतिक्रिया होणं,हार्मोन्स मध्ये बदल होणे, धूम्रपान करणे, तोंडाची अस्वच्छता,आनुवंशिक किंवा आपला आहार.दात आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याचे काम करतात.दाताला चकचकीत बनविण्यासाठी बऱ्याच वेळा दंतचिकित्सकाची मदत घ्यावी लागते परंतु असे करणे खूप खर्चिक आहे. या साठी काही उपाय सांगत आहोत आपल्या आहारात काही फळांचा समावेश करून आपण सुंदर आणि चकचकीत दात मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.     
दातांना चकचकीत करतात हे 5 फळ आवर्जून ह्याचे सेवन करावे.
 
1 संत्री -
संत्री आरोग्यासाठी चांगले मानले आहे. हे व्हिटॅमिन सी चे चांगले स्रोत आहे. निरोगी हिरडे आणि दातांसाठी संत्रीचे सेवन करणे फायदेशीर आहे.कारण ह्या मध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त कॅल्शियम देखील आढळते. जे दात आणि हाडांसाठी फायदेशीर असू शकतं.
 
2 स्ट्रॉबेरी - 
स्ट्रॉबेरी एक अतिशय चविष्ट फळ आहे. हे फळ चवीलाच चांगले नाही तर आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. स्ट्रॉबेरी मध्ये मॉलिक ऍसिड असत. जे दातांचे डाग काढण्यात उपयुक्त आहे. स्ट्रॉबेरीमध्ये थोडंसं बेकिंग सोडा मिसळून लावल्यानं दातांना चकचकीत बनवू शकतो. 
 
3 सफरचंद- 
सफरचंदामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. शरीराला आरोग्याशी निगडित समस्यांपासून वाचविण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते. सफरचंद हे दातांना आणि हिरड्यांना बळकट करतो या साठी सफरचंदाचे सेवन आवर्जून करावे. 
 
4 केळी-
केळी मध्ये फायबरचे गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. केळीच्या सेवनाने पचन क्रिया सुधारते. एवढेच नव्हे तर केळी खाल्ल्यानं दातात अडकलेले अन्नाचे कण देखील निघून जातात आणि केळी दातांना चकचकीत बनविण्यासाठी मदत करतात.
 
5 किवी-
कीवीचे सेवन केल्यानं दात बळकट आणि चकचकीत बनविले जाऊ शकतात. किवी मध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फॉलिक ऍसिड आढळतात जे दातांसाठी चांगले असू शकतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स अवलंबवा आणि यश मिळवा