Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स अवलंबवा आणि यश मिळवा

परीक्षेच्या तयारीसाठी काही खास टिप्स अवलंबवा आणि यश मिळवा
, सोमवार, 15 फेब्रुवारी 2021 (18:00 IST)
परीक्षेचे नाव जरी घेतले की विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना देखील टेंशन येतच. परीक्षेचा काळ जवळ येतातच मुलांमध्ये तणावाची समस्या उद्भवू लागते. विद्यार्थ्यांना सर्वात जास्त काळजी होते की परीक्षेची तयारी कशी करावी. की त्याचा परिणाम चांगला मिळेल. या साठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत.या मुळे परीक्षेची तयारी करायला सहज आणि सोपे होईल. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 स्मार्ट स्टडी -
परीक्षेची तयारी करताना सर्वप्रथम त्या गोष्टी  वाचून घ्या ज्यांना पूर्वी आपण वाचले आहे किंवा जे सोपे आहेत. असं केल्यानं त्याची पुनरावृत्ती होईल आणि आपण त्या धडांच्या विषयी आत्मविश्वासी व्हाल. नंतर आपण अशे धडे वाचून घ्या जे स्वतंत्र आहे म्हणजे जे धडे इतर कोणत्याही धड्याशी जुळलेले नाही. असं केल्यानं आपण अधिकाधिक विभाग व्यापू शकता. परीक्षेसाठी वाचताना वेळेचे व्यवस्थापन चाणाक्षपणे करणे देखील महत्त्वाचे आहे.
 
2 अभ्यासक्रम नीट समजून घ्या-
कोणत्याही परीक्षेची तयारी सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेतला पाहिजे आणि त्याची रूपरेषा मांडायला पाहिजे. या मुळे हे समजायला सोपं होत की आपला कोणता विषय मजबूत आहे आणि कोणता विषय कमकुवत आहे. त्याच्या कडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.  
 
3 वेळापत्रक बनवून त्याचे काटेकोर पालन करावं -
अभ्यासक्रम समजून घेतल्यावर प्रत्येक विषयाला लक्षात घेऊन वेळापत्रक तयार करायला पाहिजे .वेळापत्रक बनविताना हे लक्षात ठेवा की जे विषय कमकुवत आहे त्यांच्या कडे वेळापत्रकात जास्त वेळ द्यावयाचे आहे. तसेच  या वेळापत्रकाचे काटेकोररित्या पालन केले पाहिजे. अन्यथा तयारी योग्यरित्या होणार नाही.
 
4 त्या विषयात सर्वात जास्त लक्ष द्या ज्यामध्ये कमकुवत आहात-
कोणत्याही परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक आहे की आपण त्या विषयात अधिक लक्ष द्या जे कमकुवत आहेत.तसेच दररोज इतर विषयाचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. 
 
5 सादरीकरण -
इथे सादरीकरणाचा अर्थ असा नाही की आपले अक्षर सुंदर असावे. सादरीकरण म्हणजे आपण लिहिलेल्या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहिले आहे त्यांचे स्वरूप, उत्तर लिहितांना महत्त्वाचे ठळक मुद्दे हायलाइट करणे, महत्त्वाच्या गोष्टींना पॉइंट्स मध्ये लिहिणे.गरज असल्यास रेखाचित्र काढून त्याचे वर्णन करणे. हे सर्व सादरीकरणच्या अंतर्गत येतात. 
 
6 सतत अभ्यास करू नका-  
जेव्हा देखील अभ्यासाला बसाल हे लक्षात ठेवा की सतत अभ्यास करू नये. प्रत्येक तासानंतर किमान 10 मिनिटाचा आराम घ्यावा. या मुळे मेंदूला आराम मिळतो जेणे करून आपण अभ्यास सुरू करताना गोष्टी समजण्यात सहज होते.
 
7 कोड बनवा- 
परीक्षेच्या वेळी अशा काही गोष्टी असतात जे केवळ एका शब्दाने लक्षात राहतात. त्या गोष्टी कोडच्या स्वरूपात आपल्या मेंदूमध्ये लक्षात ठेवा. जेणे करून आपल्याला परिक्षेच्या वेळी ते अधिक लक्षात ठेवण्याची गरज भासणार नाही.
 
8 नोट्स बनवा-
कोणत्याही विषयाची योग्य तयारी करण्यासाठी त्याचे नोट्स बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ह्याचा एक फायदा असा आहे की आपण वेळोवेळी ह्याचा सराव करू शकता आणि दुसरा फायदा असा की नोट्स बनवून लिहिण्याचा सराव देखील होतो. 
 
9 प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करा-
हे लक्षात ठेवा की परीक्षेच्या किमान एक महिन्यापूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण संपवून घ्या. असं केल्यानं प्रत्येक विषयाचे रिव्हिजन करण्याचा पुरेसा वेळ मिळतो.
 
10 कोल्डड्रिंक्स घेणं टाळा- 
  वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्डड्रिंक्स पिण्याची सवय परीक्षेच्या वेळी घातक ठरू शकते. चहा, कॉफी सारखे पेय देखील परीक्षेच्या वेळी घेऊ नये. या गोष्टी आपल्याला अस्थिर करतात. या मुळे पॅनिक अटॅक किंवा परीक्षेत विसरणे या सारख्या गोष्टी होणे सहज आहे. 
 
11 लेखनाचा सराव- 
भौतिकशास्त्र, गणित, अकाउंट्स सारखे विषय केवळ वाचल्याने फायदा होत नाही. अशे विषय लिहून बघण्याची गरज आहे आणि त्या गोष्टींचा सराव करावा लागेल. 
 
12 परीक्षेच्या काही तासांपूर्वी अभ्यास करणे थांबवा- 
परीक्षेच्या काही तासांपूर्वीच अभ्यास बंद करावे, मनाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. असं केल्यानं परीक्षा हॉल मध्ये प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे होते. 
 
13 सर्वप्रथम सोपे प्रश्न आधी सोडवा- 
हे सर्वांना माहिती आहे परीक्षेमध्ये पेपर लिहितांना वेळेचे बंधन असतात. म्हणून प्रश्नपत्र जवळ येतातच सर्वप्रथम सोपे प्रश्नाचे उत्तर आधी लिहावं नंतर उर्वरित प्रश्नांची उत्तरे लिहायला सहज होईल आणि वेळ देखील वाचेल. 
 
14 आरोग्याकडे लक्ष द्या- 
अनेकदा आपण परीक्षेचा वेळी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही. रात्री उशिरा पर्यंत अभ्यास करताना आपल्या जवळ सुकेमेवे ठेवल्यानं भूक कमी होण्यास मदत मिळेल. लक्षात ठेवा की खाणं हलकं असायला पाहिजे. मसालेदार आणि जंक फूड खाल्ल्यानं आपल्याला झोप येईल आणि अभ्यास करायला अवघड होईल. 
 
15 सोशल मीडिया पासून लांब राहावं-   
फेसबुक,ट्विटर,व्हाट्सअप या पासून अभ्यासाच्या वेळी लांब राहणेच चांगले आहे. हे सोशल मीडिया नेहमी आपल्याला विचलित करतात. म्हणून अभ्यास करताना फोन,टीव्ही आणि कॉम्प्युटर बंद करूनच अभ्यास करायला बसले पाहिजे. 
 
16 प्राणायाम आणि ध्यान -
प्राणायाम आणि ध्यान केल्यानं ऊर्जावान वाटते आणि मेंदू शांत राहते. या मुळे स्मरणशक्ती चांगली होईल आणि परीक्षेत चांगले गुण मिळतील. 
 
17 मनाला एकाग्र करा-
परीक्षेचा तयारीसाठी मनाला एकाग्र करणं खूप महत्त्वाचे आहे. या साठी  प्राणायाम आणि आसन करून मदत घेतली जाऊ शकते. हे मनाला एकाग्र करते. मनाला एकाग्र करण्यासाठी आपण संगीत ऐकू शकता.
 या काही टिप्स आपल्याला अभ्यास करताना मदत करतील आणि आपण संपूर्ण उत्साहाने परीक्षा देऊ शकाल. परीक्षेचा मुख्य लक्ष ज्ञानाची चाचणी करणे आहे. या वर आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टी अवलंबून असतात.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हातारपणात देखील हृदयाला तरुण ठेवणारे हे 5 योगासन