केस रेशमी आणि मऊ करण्यासाठी बरेच लोक कंडिशनर वापरतात. परंतु जर केसांचे कंडिशनर योग्य पद्धतीने न केल्याने केसांचे नुकसान होण्याची भीती असते.कंडिशनर करताना काय काळजी घ्यावी जाणून घ्या.
1 योग्य प्रमाणात घ्या- केसांना कंडिशनर केल्याने केसांना पोषण मिळतो.परंतु कंडिशनर लावताना एक चूक करतो की जास्त प्रमाणांत कंडिशनर लावतो. हे चुकीचे आहे. कंडिशनर चे प्रमाण कमी किंवा जास्त नसावे.जास्त प्रमाणत कंडिशनर लावल्याने केस चिकट होतात. त्यावर धूळ आणि माती सहज चिकटते.केस खराब होतात.
2 मुळात लावू नका- कंडिशनर लावताना सर्वत मोठी चूक जी करतो ते आहे. की कंडिशनर केसांच्या मुळात लावतो. नेहमी केसांच्या मध्यभागी कंडिशनर लावावे. मुळाला बळकट करण्यासाठी आणि केसांच्या रुक्षपणा नाहीसा करण्यासाठी तेलाचा वापर करावे.कंडिशनर मुळात लावल्याने कोणताही फायदा होत नाही.
3 किती वेळ लावून ठेवावे- कंडिशनर लावून काही वेळ ठेवा,जेणे करून केसांना ओलावा मिळू शकेल नंतर थंड पाण्याने धुवून घ्या. काही लोक केसांना कंडिशनर लावून धुवत नाही तर काही लोक कंडिशनर लावून लगेच धुवून घेतात.या दोन्ही पद्धत चुकीच्या आहे.
कसे लावावे- सर्वप्रथम केसांना धुवून स्वच्छ करा. केस चांगले कोरडे करा.नंतर कंडिशनर घेऊन केसांना लावा. लक्षात ठेवा की केसांवर जास्त दबाब टाकू नका नाही तर ते तुटू शकतात.कंडिशनर 5 ते 8 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून केस टॉवेल ने कोरडे करा.