Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिपस्टिक लावताना या चुकांकडे दुर्लक्ष करू नका

लिपस्टिक लावताना या चुकांकडे दुर्लक्ष करू नका
, बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (14:31 IST)
कोणत्याही महिलेचे सौंदर्य वाढवण्यात लिपस्टिक खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पार्टी,ऑफिस आणि लग्न यांसारख्या प्रसंगी कोणत्याही स्त्रीला सुंदर दिसण्यासाठी लिपस्टिक खूप महत्त्वाची असते. आपण लिपस्टिकचा गडद रंग वापरा किंवा न्यूड रंग, लिपस्टिक हा मेकअपचा महत्त्वाचा भाग आहे.
 
लिपस्टिक लावल्यानंतर निस्तेज चेहरा देखील चमकतो. या साठी केवळ चांगल्या दर्जाची लिपस्टिकच नाही तर ती योग्य पद्धतीने लावायला हवी. अनेक वेळा लिपस्टिक लावल्यानंतरही चेहऱ्यावर चमक येत नाही, याचे एक कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने लिपस्टिक लावणे आहे.  चला तर मग लिपस्टिक लावण्याची योग्य पद्धत जाणून घेऊ या.
 
* मॅट लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर मॉइश्चरायझर लावा- सध्या मॅट लिपस्टिक ट्रेंडमध्ये आहे. मॅट लिपस्टिक लावल्यानंतर ओठ थोडे कोरडे होतात. लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर मॉइश्चरायझर लावा. यामुळे ओठ मऊ आणि कोमल होतील आणि सुंदर दिसतील.
 
* काळ्या ओठांवर लिपस्टिक कशी लावायची- मृत त्वचा आणि पिगमेंटेशनमुळे ओठांचा रंग गडद होतो. काळ्या ओठांवर लिपस्टिकचा रंग येत नाही. अशा परिस्थितीत लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर कन्सीलर आणि फाउंडेशनचा बेस लावा. यानंतर आपली आवडती लिपस्टिक ओठांवर लावा. असं केल्याने ओठ सुंदर दिसतील.
 
* लिप लाइनर चा वापर- परफेक्ट लिपस्टिक लावण्यासाठी लिप लायनरचा वापर करावा. लिपस्टिक लावण्यापूर्वी लिप लाइनरने ओठांची रेषा काढा. त्यानंतर लिपस्टिक लावा. लिप लाइनर नेहमी लिपस्टिकच्या शेडशी जुळणारे असावे. पातळ ओठ असलेल्या महिला मोठ्या आणि जाड ओठा दिसण्यासाठी  लिप लाइनर वापरू शकतात.
 
* लिप ब्रशने लिपस्टिक लावा- काहीवेळा थेट ओठांवर लिपस्टिक लावल्याने लिपस्टिक पसरते,आपण ब्रशच्या मदतीने लिपस्टिक लावू शकता. ब्रशच्या मदतीने आपण ओठांना आकार देऊ शकता. बऱ्याच स्त्रियांना ब्रशने लिपस्टिक कशी लावायची हे माहित नसते. पण आपण ब्रशने अगदी सहजरित्या  लिपस्टिक लावू शकता. ब्रशने लिपस्टिक लावण्यासाठी, ओठांच्या वर V आकारात ब्रश सुरू करा. यानंतर ब्रशच्या मदतीने ओठांच्या दोन्ही कोपऱ्यांना लिपस्टिक लावा. यानंतर खालच्या ओठांवर ब्रशने लिपस्टिक लावा
 
* अतिरिक्त लिपस्टिक काढा- लिपस्टिक लावल्यानंतर ओठांवरची अतिरिक्त लिपस्टिक काढून टाकणे आवश्यक आहे. लिपस्टिक काढण्यासाठी आपण  टिश्यू पेपर वापरू शकता. टिश्यू पेपर घ्या आणि ओठांवर दाबा, असं केल्याने अतिरिक्त लिपस्टिक निघून जाईल.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GAIL Recruitment 2022: GAIL मध्ये या विविध पदांवर चांगल्या पगाराची नौकरीची संधी