Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ग्लोइंग स्किनसाठी सोयाबीनचा स्क्रब बनवा, त्वचा उजळेल

ग्लोइंग स्किनसाठी सोयाबीनचा स्क्रब बनवा, त्वचा उजळेल
, बुधवार, 9 मार्च 2022 (08:32 IST)
लग्नाचा हंगाम पुन्हा एकदा आला आहे, अशा परिस्थितीत महिला लग्नाला जाण्यापूर्वी तासनतास पार्लरमध्ये घालवत असतात आणि त्यांची त्वचा स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर देखील करतात. आजकाल प्रत्येकजण झटपट त्वचा ग्लो मिळविण्यासाठी विविध त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरतात. पण तरीही ती हवा तसा ग्लो मिळत नाही. यासोबतच या उत्पादनांमध्ये अनेक प्रकारची रसायने असतात ज्यामुळे त्वचेला नुकसान होते. अशा परिस्थितीत आपण घरगुती फेस पॅक किंवा स्क्रब वापरू शकता. आणि ग्लो मिळवू शकता. 
 
आपण सोयाबीनच्या वड्या वापरून त्वचेसाठी फायदेशीर स्क्रब बनवू शकता. सोयाबीनमध्ये सर्व गुणधर्म आढळतात, ज्यामुळे आपली त्वचा तरुण राहते. हा स्क्रब वापरल्यानंतर आपल्याला झटपट ग्लो मिळेल. कोणत्याही लग्नात किंवा पार्टीला जाण्यापूर्वी ते स्क्रब लावा असं केल्याने आपल्याला त्वचेवर बदल होताना  दिसेल. 
 
फेस स्क्रब कसा बनवायचा 
ते बनवण्यासाठी खलबत्त्यात  दोन ते तीन सोयाबीन टाकून बारीक करून पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये अर्धा चमचा खोबरेल तेल मिसळा. यामध्ये तुम्ही व्हर्जिन कोकोनट ऑइल देखील वापरू शकता.
 
हे कसे वापरायचे -
हे स्क्रब त्वचेवर लावण्यापूर्वी त्वचा हलकी ओलसर करा. त्यानंतर स्क्रबने चेहरा आणि मानेला चांगले मसाज करा. मसाज केल्यानंतर, एक मऊ कापड ओला करून त्वचा स्वच्छ करा. नंतर हातात थोडे बेसन घेऊन त्यात काही थेंब पाणी टाका, त्यानंतर या पेस्टने चेहरा धुवा. असे केल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल निघून जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगासन : ताडासन योग रक्ताभिसरण वाढवण्यासाठी फायदेशीर