Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रसूती नंतर तजेल त्वचेसाठी या 6 सोप्या टिप्स अवलंबवा

प्रसूती नंतर तजेल त्वचेसाठी  या 6 सोप्या टिप्स अवलंबवा
, शनिवार, 16 जानेवारी 2021 (20:00 IST)
प्रसूती नंतर बायकांच्या शरीरात बरेच बदल होतात. या मुळे  त्यांच्या त्वचेवर देखील बरेच बदल होतात. या वेळी बायका आपल्या त्वचेची अजिबात काळजी घेत नाही. पण हा काळ असा असतो जेव्हा त्वचे ची सर्वात जास्त काळजी घ्यावयाची असते. यांसाठी आपण बरीच प्रकारच्या स्किन केयर टिप्स अनुसरू शकता.पण नवीन आई बनलेली बाई बाळाची काळजी घेण्यात इतकी व्यस्त असते की तिच्याकडे स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळच नसतो. यासाठी तज्ञानी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत चला तर मग या टिप्स बद्दल जाणून घेऊ या.
 
* सनस्क्रीन चा वापर करावा- 
प्रसूती नंतर नवीन आईला नेहमी सनस्क्रीनचा वापर करू नका. प्रसूतीनंतर त्वचेत मेलास्मा होण्याची शक्यता वाढते.मेलास्मा त्वचेशी जुडलेली ती स्थिती आहे ज्यामध्ये चेहरा विशेषतः नाक, गाल आणि कपाळी तपकिरी रंगाचे डाग आणि फिकट तपकिरी रंगाचे डाग बनू लागतात. हे तपकिरी डाग मानेवर, खांद्यावर आणि हातापासून कोपऱ्या पर्यंत पसरतात. मेलास्मा त्वचेच्या पिगमेंटेन्शनशी निगडित समस्या आहे. गरोदर पणात स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल वाढतात. या साठी नेहमी सनस्क्रीन चा वापर करावा. ज्यामुळे  स्किन पिगमेंटेन्शन ची  शक्यता कमी होते.
 
* भरपूर पाणी प्या- 
पाणी शरीराच्या सह त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक आहे. त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे असते. हे त्वचेला तजेल ठेवते.बाळाच्या जन्मानंतर नवीन मातांची सर्वात सामान्य समस्या म्हणजे पाणी अजिबातच न पिणे.ह्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो.त्यामुळे चेहरा निस्तेज आणि कोरडा  दिसतो . म्हणून दिवसातून किमान 4 ते 5 लिटर पाणी प्यावं.
 
* त्वचेला मॉइश्चराइझ करा- 
बाळाच्या जन्मानंतर नवीन मातांना सर्वात जास्त काळजी एका चांगल्या मॉईश्चराइझर आणि अंडर आय क्रीम वर दिले पाहिजे. या साठी आपण आपल्या त्वचेला ओळखून मॉइश्चरायझर आणि अंडर आय क्रीम वापरा.हे आय बॅग्स ला दूर करण्यात मदत करत. अशे उत्पाद वापरा जे आपल्या डेमेज्ड आणि अंजिंग स्किन ला सुधारण्यात मदत करतो. त्वचेत कोलेजनंचे उत्पाद वाढवा. ज्यामुळे प्रसूतीनंतर होणाऱ्या फाईन लाईन्स होत नाही.
 
* रात्रीच्या स्किन केयर रुटीन अनुसरण करा-
नवीन मातांना एक सोपं असं स्किन केयर रुटीन पद्धती अवलंबवावी. या मध्ये सोपे क्लिंजिंग आणि मॉइश्चराइजिंग समाविष्ट असावे. रात्री झोपण्याच्या पूर्वी देखील आपण त्वचेवर ह्याचा वापर जरूर करावा. 
 
* निरोगी आहार - 
नवीन मातांना सर्वात जास्त लक्ष आपल्या आहाराकडे दिले पाहिजे. या मुळे त्यांच्या चेहऱ्यावर चमकच येत नाही तर त्वचेला निरोगी देखील बनवतं. या साठी आपल्या आहारात फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समाविष्ट करावा. फळ आणि भाज्यांमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचेला पिग्नेन्टेशन पासून वाचवतात. 
 
* व्यायाम करा -
नवीन मातांना सर्वात जास्त समस्या कमी झोपल्याने होतात. लहान बाळांचा  त्यांचा झोपणाच्या काहीच  काळ नसतो त्यामुळे आईला देखील बाळाबरोबर जागांव लागतं. या साठी त्यांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पुरेशी झोप घ्यावी आणि निरोगी राहण्यासाठी घरातच दररोज कोणती ना कोणता व्यायाम करावा.
 
तज्ज्ञाच्या या टिप्स ला अवलंबवून नवीन माता आपल्या त्वचेला तजेल बनवू शकतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अस्वल आणि दोन मित्र