Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मेकअप न करता दिसायचे आहे सुंदर या पाच टिप्स अवलंबवा

Beetroot Face Pack
, बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (17:35 IST)
या पाच टिप्स मदतीने मेकअप न करता दिसू शकतात सुंदर. डाइटमध्ये बीट, पालक, पपई, कीवी हे सहभागी करणे. नियमित स्किनकेयर करणे आणि सनस्क्रीम लावणे. भरपूर पाणी पिणे योग्य झोप घेणे हे सुंदर त्वचेसाठी चांगले असते. 
Beauty Tips- आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते. प्रत्येकाला नैसर्गिक सुंदर दिसावे असे वाटते. पण काही लोक सुंदर दिसण्यासाठी मेकअप करतात. चांगल्या पद्धतीने मेकअप करणे ही एक कला आहे. पण काही लोकांना प्राकृतिक रुपाने सुंदर दिसावे असे वाटते. तुम्हाला फक्त एक क्रीम सुंदर बनवू शकत नाही. सुंदर दिसणे म्हणजे स्वताच्या चेहऱ्याला चांगले प्रस्तुत करणे. सोबतच एक चांगली त्वचा तुमच्या आतमध्ये आत्मविश्वास जागवते. 
 
तसेच सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला काही चांगल्या सवयी स्वताला लावाव्या लागतील. या चांगल्या सवयी तुमच्या त्वचेला आरोग्यदायी ठेवतील. स्वत:च्या त्वचेला चांगले ठेवण्यासाठी फक्त गरजेचे नाही चला जाणून घेऊ कसे तुम्ही स्वत:ला सुंदर ठेऊ शकतात. 
 
1. हेल्दी डाइट- स्किनला हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी डाइट असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डाइटमध्ये फळ आणि भाज्या यांचा समावेश करणे. फास्ट फ़ूडच्या सेवनाने तुमच्या शरीराला आणि त्वचेला नुकसान होईल. तुम्ही डाइटमध्ये पालक, बीट, गाजर यासारख्या भाज्या घेऊ शकतात. सोबतच कीवी, पपई, डाळिंब, हे फळे स्किनसाठी खूप आरोग्यदायी आहे. यांच्या नियमित सेवनाने स्किन ग्लो करेल. 
 
2. पुरेसे पाणी पिणे- हेल्दी डाइट सोबतच पुरेसे पाणी पिणे हे पण महत्वाचे आहे. पाणी तुमच्या शरीराला आणि त्वचेला हाइड्रेट ठेवते. सोबतच कोरडी त्वचा, खाज, काळेपण या समस्येचे कारण कमी पाणी पिणे होय तुम्ही दिवसभरात कमीतकमी आठ ग्लास पाणी पिण्याचे प्रयत्न करा. पुरेस पाण्याने तुमची पाचन क्रिया सुरळीत राहिल. ज्यामुळे शरीरातून दूषित पदार्थ बाहेर निघून जातील. 
 
3. चांगली झोप घेणे- चांगली झोप आरोग्यासाठी चांगली असते. जर तुम्ही कमी झोपत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचा प्रभाव पडेल .व त्यामुळे तुमच्या त्वचेवर डार्क सर्कल, सुरकुत्या यांसारख्या समस्या निर्माण होतील. जेव्हा तुम्ही जास्त झोप घेतात तेव्हा स्किन चांगली राहते याकरिता चांगली झोप घेणे गरजेचे आहे. 
 
4. नियमित स्किनकेयर- खूप वेळेस तुम्ही चेहरा वॉश करणे विसरुन जातात. चेहरा वॉश केल्यानंतर मॉइस्चराइजर लावत असाल. नियमित स्किनकेयर करणे गरजेचे आहे तुम्ही स्किनकेयर प्रोडक्ट कमी निवडा पण स्कीननुसार निवडा. सोबतच चांगले स्किनकेयर चांगला रिझल्ट देतात कोणते पण प्रोडक्ट लावल्यानंतर लगेच तुमची स्किन चमकत नाही तुम्हाला नियमित वेळी स्किनकेयर करावे लागेल. 
 
5. सनस्क्रीन लावावे- तुम्ही तुमच्या त्वचेला सनस्क्रीनच्या मदतीने चांगले करू शकतात. सूर्यप्रकाशमुळे स्किन डॅमेज होऊन जाते. यामुळे सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. नियमित सनस्क्रीनच्या वापरमुळे तुम्ही तुमच्या स्किनटोनला चांगले बनवू शकतात. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Propose Day जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी या 5 पद्धतींपैकी कोणतीही एक निवडा