Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुंदर त्वचा हवीय? तर या सवयी बदला

सुंदर त्वचा हवीय? तर या सवयी बदला
अनेकदा अनेक ब्युटी प्रॉडक्ट्स वापरुन किंवा घरगुती प्रयत्न करत स्किनची खूप काळजी घेऊन देखील ग्लो येत नाही. याचे कारण दररोज घडत असलेल्या चुका. आपल्या लहान चुकांचा परिणाम त्वचेवर बघायला मिळतो. दररोज करत असलेल्या कामांमुळे स्कीन डॅमेज होते आणि आम्हाला त्याची जाणीव देखील नसते. अशात जाणून घ्या आपल्याला कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी ते: 
 
गरम पाण्याने अंघोळ
अनेक लोकांना बारी महिने गरम पाण्याने अंघोळ करण्याची सवय असते. किंवा काही लोकं सॉना बाथ किंवा हॉट शॉवर घेणे पसंत करतात. परंतू अधिक उष्णता आपल्या त्वचेसाठी नुकसानदायक ठरते. याने त्वचा कोरडी पडते आणि त्वचेमधील नैसर्गिक मॉइश्चर नाहीसं होतं. अशात कोमट पाण्याने अंघोळ करणे योग्य ठरेल.
 
अधिक प्रमाणात मीठ किंवा साखर
मीठात आढळणारे सोडियम शरीरासाठी आवश्यक तत्व असले तरी अती प्रमाणात मीठ खाल्ल्याने त्वचा कोरडी, निर्जीव पडते. तसेच अती गोड खाणे देखील त्वचेच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. अधिक साखर खाल्ल्याने त्वचेची कोलाजन पातळी प्रभावित होते आणि त्यामुळे त्वचा लूज होते. 
 
कुशीवर झोपणे
आपल्याला पूर्ण रात्र एका कुशीवर झोपण्याची सवय असेल तर ही बदलणे योग्य ठरेल. कारण कुशीवर झोपल्याने चेहरा उशीवर घासला जातो आणि यामुळे वयापूर्वीच सुरकुत्या पडू लागतात.
 
अती पोहणे
पोहणे शारीरिक आरोग्यासाठी योग्य असले तरी स्विमिंग पूलच्या पाण्यातील क्लोरीन आपल्या त्वचेसाठी हानिकारक आहे. स्विमिंगनंतर शॉवर घेतले तरी क्लोरीन पूर्णपणे निघत नाही आणि त्वचेच्या रोम छिद्रांपर्यंत पोहचून त्यांना बंद करतं. अशात स्किन डॅमेज होते.
 
स्मोकिंग
आपण स्मोकिंग करत असाल किंवा स्मोकिंग करत असलेल्या व्यक्तीसोबत उपस्थित राहत असाल तर निश्चितच आपल्या आरोग्यावर याचा प्रभाव पडेल आणि हे आपल्या त्वचेसाठी नुकसानदायक ठरेल. सिगारेटच्या धुरात आढळणारे हानिकारक निकोटीन आणि टार स्किनला सॅगी बनवतात ज्याने वयापूर्वीच चेहर्‍यावर वयस्कर असल्याची चिन्हे दिसू लागतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पीरियड्सच्या वेदनांपासून मुक्तीसाठी त्या दिवसात काय खावे काय नाही जाणून घ्या