Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरीराची गंध या टिप्स ने दूर करा

शरीराची गंध या टिप्स ने दूर करा
, मंगळवार, 2 मार्च 2021 (09:55 IST)
आज बहुतेक स्त्रिया आपल्या चेहऱ्याला चमकविण्यासाठी खूप काळजी घेतात या साठी महागड्या सौंदर्य प्रसाधने वापरतात. परंतु शरीरा मधून येणाऱ्या वासाकडे दुर्लक्ष करतात.या मुळे अनेकदा त्यांना इतरांसमोर लाजिरवाणे व्हावं लागत. अशी स्थिती उन्ह्याळ्यात जास्त करून येते. की या दिवसात शरीरातून दुर्गंध येते. अशा परिस्थितीत आवश्यक आहे की त्वचेच्या काळजीसह शरीराच्या दुर्गंधी कडे देखील लक्ष दिले पाहिजे जेणे करून त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्त्व उजळून निघेल. काही अशा टिप्स आहेत ज्यामुळे घामाचा वास येणार नाही आणि आपल्याला लाजिरवाणे व्हावं लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 लिंबाचा रस- 
या मध्ये व्हिटॅमिन सी असते जे शरीराला हायड्रेट करत त्यासह हे पचन तंत्र देखील सुरळीत ठेवत. वजन देखील कमी करत त्वचा उजळतो. लिंबाचा रस त्वचेच्या पीएच पातळी ला कमी करून त्वचेचे बेक्टेरिया मारण्याचे काम करतात. जे शरीरात दुर्गंध पसरवतात.या साठी अर्धा लिंबू कापून काखेत 2 -3 मिनिटे चोळा. नंतर सुकल्यावर पाण्याने स्वच्छ करा.किंवा चिरलेल्या लिंबावर मीठ घालून काखेत 10 मिनिटे चोळा. नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या असं किमान आठवड्यातून 4 वेळा केल्यानं घामाच्या वासापासून सुटका मिळेल.
 
2 चहा- 
चहा मध्ये असलेले टेनीन्स त्वचेला कोरड ठेवून घामाच्या वासाला कमी करतात. या साठी थोडक्या पाण्यात ग्रीन टी घालून उकळवून घ्या. थंड करून गाळून घाम येणाऱ्या भागावर लावा.5 ते 10 मिनिटानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ करून घ्या. किंवा आपण 1 लीटर पाणी उकळवून त्यामध्ये 2 ग्रीन टी बॅग्स घालून 10 मिनिटे तसेच ठेवा नंतर हे द्रव्य अंघोळीच्या पाण्यात घालून या पाण्याने अंघोळ करा. आठवड्यातून 2 ,3 वेळा असं केल्यानं या मुळे घामाचा वास येणार नाही.
 
3 बेकिंग सोडा- 
  हे त्वचेच्या पीएच पातळीमध्ये बदल करून बेक्टेरिया  वाढण्यापासून प्रतिबंधित करतो. या साठी आपण बेकिंग सोडा काखेत आणि पायाच्या बोटांच्या मध्ये लावून रात्रभर तसेच ठेवा आणि हाताच्या मदतीने स्वच्छ करून घ्या हे मॉइश्चर काखेतून आणि पायातून येणाऱ्या वासाला कमी करते. या साठी एक कप पाण्यात 2 मोठे चमचे बेकिंग सोडा घालून स्प्रेच्या बाटलीत घालून दररोज घामाच्या ठिकाणी लावू शकता. या मुळे कपड्यांवर डाग लागू नये या साठी हे लावल्यावर थोड्यावेळ तसेच वाळू द्या नंतर समप्रमाणात बेकिंग सोड्यात कॉर्नस्टार्च मिसळून हे पावडर देखील  त्या भागावर लावून घ्या या मुळे देखील घामाचा वास नाहीसा होईल.
 
4 टोमॅटोचा रस- 
टोमॅटोमध्ये अ‍ॅस्ट्रिजेन्ट्स आणि अँटीऑक्सिडेंट्सच्या गुणधर्मांमुळे
ते जास्त घाम येणाऱ्या ग्रंथींसह बेक्टेरिया देखील कमी करतात. या साठी  टोमॅटोच्या रसात कपड्याला बुडवून शरीराच्या त्याभागाला लावा जिथे वास येतो. या मुळे छिद्र बंद होण्यासह जास्त प्रमाणात निघणारा घाम कमी होतो. हे आठवड्यातून किमान 2 वेळा करा. 
 
5 अप्पल साईड व्हिनेगर- 
या मध्ये ऍसिडिक गुणधर्म असल्यामुळे शरीरातील विषारी सूक्ष्मजीव नष्ट करण्याचे काम करतो. या साठी अप्पल साईड व्हिनेगर मध्ये कॉटन बॉल्स बुडवून त्याला काखेत, पायाच्या बोटांमध्ये लावून अर्धा तास तसेच ठेवा या. मुळे त्वचेवर होणारे बेक्टेरिया नाहीसे होऊन त्याचा वास येणार नाही अशा प्रकारे घरात राहून काही टिप्स अवलंबवून  शरीरातून येणाऱ्या वासाला दूर करू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वयंपाकघर स्वच्छ कसे ठेवाल टिप्स जाणून घ्या.