शरीरावर लठ्ठपणा मुळे स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. तसेच बायकांमध्ये गरोदरपणानंतर पोटाच्या भागास स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. जे दिसायला फारच वाईट असतात. अश्या परिस्थितीत कोणत्याही प्रकाराचा ड्रेस घातल्यावर लाजिरवाणी होत. पण आता आपल्याला या स्ट्रेच मार्क्स पासून घाबरायची किंवा लाजायची गरज नाही. या स्ट्रेच मार्क्सला आपण मेकअपच्या साह्यायाने लपवू शकतो. चला तर मग जाणून घेउया मेकअपच्या काही सोप्या टिप्स.
योग्य कलर निवडा:
सर्वात आधी हे जाणून घ्या की कोणत्याही प्रकाराचे मार्क्स लपविण्यासाठी योग्य कलर निवडा. जर स्ट्रेच मार्क्स लाल किंवा जांभळे दिसत आहे तर या साठी पिवळ्या रंगाचे करेक्टर निवडणं चांगले आहे. तेच जुने मार्क्स शरीराच्या रंगाचे होतात त्यासाठी कोणत्याही प्रकारचे करेक्टरची गरज नसते कारण हे फार फिकट रंगाचे असतात.
फुल कव्हरेज फाउंडेशन :
स्ट्रेच मार्क्सला लपविण्यासाठी फुल कव्हरेज फाउंडेशन आवश्यक आहे. त्यांच्या योग्य वापर करून स्कार्स पासून ते हायपरपिगमेंटेशन पर्यंत सर्व काही लपवू शकतो. फुल कव्हरेज फाउंडेशन आपल्या त्वचेवर वेगाने पसरतो आणि आपल्या त्वचेच्या टोनसारखा दिसून येतो. त्यामुळे त्वचेचा तो भाग मऊ आणि नैसर्गिक दिसू लागतो.
मेकअप सेट करा :
आपली इच्छा असल्यास की हे दिवसभर टिकून राहावं. तर मेकअप ब्रशच्या साहाय्याने सेटिंग पावडर लावून चांगले पसरवून घ्या.
सेल्फ टॅनर लावा :
स्ट्रेच मार्क्स आणि शरीराच्या कोणत्याही भागाच्या टॅन लाईनला लपविण्यासाठी सेल्फ टॅनर बाजारपेठेत मिळतं. बाजारपेठेत मिळणाऱ्या चांगल्या प्रकारच्या सेल्फ टॅनरने आपण मेहनत आणि मेकअपच्या शिवाय या खुणा सहजच लपवू शकता.