Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तम झोप हवी असेल, तर या गोष्टी नक्की करा!

उत्तम झोप हवी असेल, तर या गोष्टी नक्की करा!
, शुक्रवार, 26 जून 2020 (17:59 IST)
निद्रानाश आजकाल सर्वांनाच जाणवतो. अपुऱ्या झोपेमुळे आपण अनेक आजारांना आमंत्रण देतो. शिवाय रोजचा जाणवणारा त्रास हा वेगळाच. या साऱ्यापासून सुटका करून तुम्हाला उत्तम झोप हवी असेल, तर या गोष्टी नक्की करा!
 
झोपेची वेळ निश्चित असावी
रोज झोपायची आणि उठायची वेळ ही निश्चित असावी. अगदी वीक-एण्ड असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळेत बदल होता कामा नये.
 
झोपेची जागा निश्चित असावी
तुमच्या झोपेची जागा निश्चित असावी. अनेकांना झोपताना चित्रपट पाहणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे, ई मेल्स चेक करण्याची सवय असते. पण यासारख्या सवयी तुमच्या अपु-या झोपेला कारणीभूत ठरू शकतात. अनेकांना झोपण्यापूर्वी बेडवर कामे करत बसण्याची सवय असते. पण हीच सवय तुमच्या झोपेला मारक ठरेल.
 
उत्साहवर्धक पेय टाळा
झोपण्याच्या सहा तास पूर्वी चहा, कॉफी किंवा रेड बुल सारखी उत्साहवर्धक पेय पिणे टाळावे. अनेकांना ही पेय पिण्याची सवय असते. पण थोडं थांबा, कारण तुमच्या निद्रानाशाला या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात.
 
डुलक्या आवरा
अनेकांना झोपण्यापूर्वी डुलक्या देण्याची सवय असते. या डुलक्या देणे तुमच्या निद्रानाशाला कारणीभूत ठरू शकतात. जर तुम्ही खूप दमला असाल, तर डुलक्या देण्यापेक्षा सरळ झोपून जा.
 
घड्याळाकडे बघणे टाळा
अनेक जण झोपण्यापूर्वी घड्याळ पाहतात. आपण अद्याप का झोपलो नाही? असा विचार करत असतात. हा विचार तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. परिणामी त्याचा परिणाम हा तुमच्या झोपेवर होऊ शकतो.
 
झोप आल्यावरच अंथरुणावर पडा
जर तुम्हाला झोप आली असेल, तरच तुम्ही अंथरुणावर पडा. पण झोपण्यापूर्वी लॅपटॉप हाताळणे, टीव्ही पाहणे यारख्या गोष्टी टाळा.
 
सकाळी व्यायाम हा उत्तम पर्याय
सकाळी केलेला व्यायाम हा उत्तम झोपेसाठी केव्हाही फायदेशीर. सकाळचा व्यायाम तुम्हाला दिवसभर अॅक्टिव राहण्यास मदत करतो. झोपण्यापूर्वी किमान ३ ते 4 तास अगोदर व्यायाम करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मन म्हणजे काय हो ?