कोरोनाच्या काळात अनेक प्रकारच्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. जसे की सामाजिक अंतर राखणं, स्वच्छता ठेवणं, मास्कचा वापर करणं. जेणे करून ते कोरोनाच्या संसर्गामध्ये अडकू नये. त्याच वेळी ते लोकं जे आधी पासूनच कोणत्या ना कोणत्या रोगाने ग्रस्त आहे, त्यांनी तर अजिबात दुर्लक्ष करू नये नाहीतर त्यांचा आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम पडू शकतो. त्याच बरोबर त्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट दम्याच्या रुग्णांसाठी देखील लागू पडते. अशे लोकं जे दम्यासारख्या श्वसनाच्या त्रासाशी झुंज देत आहे, त्यांना त्यांचा आरोग्यासाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
दमा ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये श्वास नलिकेत सूज येते. जेणे करून श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास नलिकेमध्ये जास्तीचा श्लेष्मा (म्युकस) बनू लागतो. श्वास घेण्याचा त्रासामुळे खोकला येतो आणि नळ्या आकुंचन पावल्यामुळे धाप लागते. कोरोनाच्या काळात दम्याच्या रुग्णांना काही खास सावधगिरी बाळगायची गरज आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती काळजी घ्यावयाची आहे...
* या दरम्यान संतुलित आहार घ्यावा आणि पौष्टिक आहाराला आपल्या आहार योजनेमध्ये समाविष्ट करावं. फळ आणि हिरव्या भाज्या खाव्या.
* ऍलर्जीचा धोका बदलत्या हंगाम्यात जास्त वाढतो, म्हणून आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.
* ज्यांना सर्दी खोकला सारखा त्रास आहे त्यांच्या पासून अंतर राखा.
* स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. ज्या वस्तूंना आपण जास्त स्पर्श करता त्यांना स्वच्छ ठेवा, जसे की मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, रिमोट आणि दाराचे हॅण्डल्स इत्यादी.
* घरातील आर्द्रता कमीत कमी ठेवा जेणे करून श्वासाशी निगडित त्रास उद्भवू नये. धुराने आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून याची काळजी घ्या.
* कुठल्याही गोष्टींचा ताण न घेता राहण्याचा प्रयत्न करा.
* ध्यानाचा सराव नियमाने करावं. जेणे करून आपण शारीरिक आणि मानसिकरीत्या दोन्ही प्रकारे निरोगी राहाल.