Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनिवारी मान्सून अंदमानात तसेच 11 जूनपर्यंत मुंबईमध्ये धडक

शनिवारी मान्सून अंदमानात तसेच 11 जूनपर्यंत मुंबईमध्ये धडक
मुंबई , बुधवार, 13 मे 2020 (15:01 IST)
यंदा नैऋत्य मोसमी वारे अर्थात म न्सून कधी येणार याचेही संकेत मिळाले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने तो 16 मेपर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर दाखल होऊ शकणार आहे. मुंबईत मान्सून 11 जून रोजी धडकणार असल्याचे संकेत आहे.
 
सर्वसाधारणपणे दक्षिणेकडून म्हणजेच केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचे वेळापत्रक बदलते. दरवर्षी 20 मे रोजी अंदमानात धडकणारा मान्सून यंदा 16 मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभाग आणि स्कायमेटने वर्तवला आहे. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंकेकडे रवाना होतो आणि आठवडाभरानंतर केरळमध्ये धडकतो.
 
गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमन आणि समापनाचा कालावधी बदलला आहे. यामध्ये एक आठवड्याचे आंतर निर्णाण झाले आहे. पूर्व भारतामध्ये तीन ते सात दिवस उशीरा मान्सून दाखल होणार आहे. तर उत्तर-पश्चिम भारतातही उशीराने आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे.
 
त्यानुसार, जूनच्या दुसर्याण आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल. 11 जूनपर्यंत मान्सून मुंबईमध्ये धडक देऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशात मान्सून 3 ते 7 दिवस लवकर किंवा उशिराने येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतातही 15 जुलै ऐवजी 8 जुलैला मान्सून दाखल होईल. राजधानी दिल्लीमध्ये यंदा 23 जून ऐवजी 27 जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता स्कायमेटने दर्शवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार यंदा 8 ऑक्टोबर पर्यंत मान्सूनचा कालावधी राहणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आहे 5 लाखाचे इमरजेंसी कर्जाचे सत्य, SBI ने ग्राहकांना केलं सावध