टिप्स / या मोसमात निळ्या रंगाने वाढवा आपला स्टायल स्टेटमेंट, मुलं आणि मुली दोघांना देईल स्टायलिश लुक

सोमवार, 16 सप्टेंबर 2019 (15:10 IST)
फॅशन ट्रेड नेहमी बदलत राहते पण मान्सूनमध्ये वादळांशी तत्सम रंग ब्ल्यूची डिमांड प्रत्येक वर्ष वाढत आहे. ब्ल्यू एक वर्सेटाइल आणि रॉयल कलर आहे. सध्या वेस्टर्न वियरचे असे काही विकल्प आहे ज्यात ब्ल्यूचा क्रेझ बघायला मिळतो. फक्त मुलीच नाही तर मुलं देखील या रंगाच्या प्रत्येक शेडचा प्रयोग करत आहे.
 
ब्ल्यू रंगाला या स्टायलमध्ये ट्राय करा  : जंपसूट
जंप सूटचे शॉर्ट ते लाँग व्हेरायटी आपल्या आवडीनुसार निवडू शकता. तुमच्या स्टायला वाढवणारे हे ड्रेस नेहमी कमरेपासून फिट असायला पाहिजे. त्यासोबतच स्लिक बेल्टाची पेयरिंग छान दिसते. यासोबतच बॅग, जोडे आणि असेसरीजमध्ये कंट्रास्ट रंगांची निवड करा.
ब्लु शर्ट
डार्कपासून टरक्वाइश ब्लु मान्सूनचा लेटेस्ट ट्रेड आहे. यात कॉटन ते लिनेनपर्यंत फॅशनमध्ये इन आहे. त्यासबोतच तुम्ही बीज ट्राउजर्स ट्राय करू शकता. हे तुमच्यावर फार डीसेंट लुक देईल. ब्ल्यू शर्टासोबत ग्रे पेंटचे कॉम्बिनेशन पर्फेक्ट आहे.
फॉर्मल वियर
ब्ल्यूचे फॉर्मल वियर ऑफिस ते नाइट पार्टीसाठी योग्य विकल्प असू शकतो. ईवनिंग पार्टीसाठी ब्ल्यू शर्ट, ब्लेझर, ट्राउझर आणि टी शर्टच्या बर्‍याच व्हेरायटी उपस्थित आहे. 
शॉर्ट ब्लेझर  
ब्ल्यू शॉर्ट ब्लेझर तुम्ही बर्‍याच प्रकारच्या वेस्टर्नवियरसोबत घालू शकता. या प्रकाराच्या ब्लेझरला सलवार-कमीज किंवा टॉपसोबत टीमअप करा. 
वन पीस ब्ल्यू ड्रेस
आउटिंग असो किंवा हॉलिडे प्लान करत असाल तर ब्ल्यू कलर वन पीस ड्रेसचे शॉर्ट किंवा लॉग ऑप्शन आवडीनुसार निवडा. याच्यासोबत सनग्लास देखील सूट करेल.
या गोष्टींकडे लक्ष द्या
लाइट ब्ल्यूसोबत व्हाईटचे कॉम्बिनेशन सध्या ट्रेडिंगमध्ये आहे. यावर गोल्ड थ्रेड वर्क देखील छान दिसतात.
ब्ल्यूसोबत मोनोक्रोमेटिक मेकअप सूट करतो. यात डोळे, गाल व ओठांचा मेकअप एकाच रंगाने करा.
ब्ल्यू एथनिक वियरसोबत लेसची निवड करा. सेमी ट्रांसपेरेंट जेली सँडल्स देखील तुम्हाला स्टायलिश लुक देईल.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख १७ बँकामध्ये १२ हजार पेक्षा अधिक जागा, फी, फॉर्म आणि शेवटची तारीख सर्व माहिती