Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी साखर, विश्वास बसत नसेल तर ट्राय करुन बघा

webdunia
, शुक्रवार, 31 जानेवारी 2020 (12:05 IST)
साहित्य
तीन ते चार चमचे लिंबाचा रस
दोन चमचे साखर
 
वापरण्याची पद्धत
लिंबाचा रस आणि साखर मिसळून स्क्रब तयार करा.
हे स्क्रब पाच ते दहा मिनिटांसाठी हळुवार चेहऱ्यावर लावा, चोळू नका.  
नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या. 
हा स्क्रब आठवड्यातून एकदा वापरता येतो.
 
हे कसे कार्य  करते?
लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट म्हणून कार्य करते. जे चेहर्‍यावरील घाण काढून टाकते आणि स्वच्छ करते. या स्क्रबचा जास्त वापर न करण्याचा सल्ला दिला जातो. जर आपली त्वचा संवेदनशील असेल तर हे स्क्रब वापरण्याआधी ऍलर्जीची खात्री करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कंफर्ट वर्सेस फॅशन, दोन्ही कसे मिळवाल?