Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी होममेड पॅक

कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी होममेड पॅक
, सोमवार, 16 ऑगस्ट 2021 (12:10 IST)
व्यस्त जीवनात त्वचेची काळजी घेणं जरा अवघडं होतं पण जेव्हा कुठे जायचं असेल तेव्हा आपल्या त्वचेची काळजी घेण्याची आठवण होते. परंतु त्या वेळी कोणताही उपाय सुचतं नाही आणि मूड खराब होतं. पण काळजी करण्याची गरज नाही. आपण अजून देखील आपली काळजी घ्या... विशेष करुन कपाळावर येणार्‍या सुरकुत्या नाहीश्या करण्यासाठी...
 
1. गाजर आणि अंड्याचं पॅक
गाजरमध्ये आढळणारे घटक बीटा कॅरोटीन, आयोडीन सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. सोबतच अंड्यांमधील पोषक घटकामुळे  त्वेचला टाइट करण्यास मदत होते. गाजर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आणि अंड्याचा पांढरा भाग चांगल्याप्रकारे मिक्स करुन घ्या. नंतर चेहर्‍यावर लावून घ्या. 20 मिनिटाने चेहरा सामान्य पाण्याने धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरता येईल.
इस पैक का जरूर इस्तेमाल करें।
 
2. ऑलिव्ह ऑयल आणि मध
कपाळावर येणार्‍या सुरकुत्या आपल्या चेहर्‍यावरी सौंदर्य कमी करतात. परंतू एक चमचा मध आणि एक चमचा ऑलिव्ह ऑयल मिसळून झोपण्यापूर्वी लावावं. सकाळी तोंड धुऊन घ्यावं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा असं करावं. काही दिवसात आराम मिळेल.
 
3. कोको पावडर आणि ऑलिव्ह ऑयल
1 चमचा कोको पावडर आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑयल घ्यावं. दोन्ही चांगल्यारीत्या मिसळून घ्यावं. नंतर चेहर्‍यावर 20 मिनिट लावून ठेवावं. नंतर पाण्याने धुऊन घ्यावं. काही दिवसात आराम मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Food For Fasting : स्वादासह आरोग्यासाठी उपवासात खावे हे 10 पदार्थ