Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

5 जडी-बुटी पांढरे कसे बनवतात नैसर्गिकरित्या काळे, जाणून घ्या कसा करावा उपयोग

jaswand
, गुरूवार, 11 जुलै 2024 (08:00 IST)
अनेक लोक काळे केस कवर करण्यासाठी अनेक प्रकारचे हेयर कलर प्रोडक्ट्स वापरतात, पण हे कलर काही काळच राहतात. मग नंतर केस परत पांढरे व्हायला सुरवात होते. तर अश्यावेळेस जडी बुटी चा उपयोग केल्यास तुमचे केस परत पांढरे होण्यास मदत होईल. या 5 जडी बुटी  कोणत्या आणि त्यांचा उपयोग कसा करावा ज्यामुळे नैसर्गिकरित्या केस काळे व्हायला मदत होईल तर चला जाणून घेऊ या. 
 
1. भृंगराज- 
भृंगराज तेल- बाजारामध्ये हे तेल उपलब्ध आहे. हे तेल रात्रभर केसांमध्ये लावून ठेवावे व सकाळी धुवून घ्यावे.
 
भृंगराज पाउडर- ही पावडर नारळाच्या तेलात घालून पेस्ट बनवून घ्या. मग केसांना लावल्यावर 1-2 तासांनी धुवून घ्यावे. 
 
2. आवळा- 
आवळा पाउडर- ही पावडर पाण्यात मिक्स करून पेस्ट बनवावी. मग लावल्यानंतर 30-45 मिनट नंतर केस धुवून घ्यावे. 
 
आवळा तेल- आठवड्यातून दोन ते तीन वेळेस या तेलाने केसांचा मसाज करावा. तसेच सकाळी लावल्यानंतर धुवून टाकावे.
 
3. कढी पत्ता- 
कढी पत्ता - कढी पत्ता नारळाच्या तेलामध्ये उकळून घ्यावा. मग हे तेल गाळून केसांमध्ये मसाज करावा. 
 
कढीपत्ता पेस्ट- कढीपत्ता बारीक करून पेस्ट बनवून घ्या. व याला केसांना लावा मग एक तासांनी केस धुवून घ्यावे.
 
4. जास्वंद फूल-
जास्वंद फूल - जास्वंदीचे फुल तेलात उकळून घ्यावे व केसांना लावावे. रात्र भर लावून सकाळी केस धुवून घ्यावे.
 
जास्वंदाची पेस्ट- जास्वंदाचे फुल आणि पाने वाटून पेस्ट बनवून घ्या आणि केसांना लावून एक तासाने केस धुवावे. 
 
5. शिकाकाई-  
शिकाकाई पाउडर- शिकेकाई पाण्यामध्ये मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. केसांना लावल्यानंतर अर्ध्या तासाने धुवून घ्यावे.
 
शिकाकाई शॅंपू - शिकाकाई पाउडरला रीठा आणि आवळा सोबत मिळवून  शॅंपू तयार करा आणि केसाना लावावा. 
 
या जडी-बूटि नियमित वापरल्यास अकाली पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे व्हायला लागतात.  
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाश्त्यामध्ये बनवा सोप्पी रेसिपी ओट्स-रवा उत्तपम