वजन कमी करायचे असल्यास काय खावे इथून सुरवात असते. तसेच सकाळचा नाश्ता त्या अनुषंगाने असावा असे वाटते. तर चला आज आपण अशी रेसिपी जाणून घेणार आहोत, जी हेल्दी देखील आहे आणि वजन कमी करण्यासाठी मदत देखील करते. त्या रेसीपीचे नाव आहे ओट्स उत्तपम. तर चला जाणून घेऊ या ओट्स उत्तपम कसे बनवावे.
साहित्य-
1 कप ओट्स
1/2 कप रवा
1/2 कप दही
1/2 कप कापलेला कांदा
1/2 कप कापलेला टोमॅटो
1/4 कप कापलेली शिमला मीर्ची
1/4 कापलेले गाजर
1/4 कप कापलेली हिरवी मीर्ची
1/4 कप कटा हुआ धनिया पत्ता
चवीनुसार मीठ
1/2 चमचा लाल तिखट
1/2 चमचा जिरे
तेल
पाणी
कृती-
ओट्स मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. एक मोठ्या बाऊलमध्ये बारीक केलेली ओट्स पाउडर, रवा आणि दही मिक्स करावे. गरजेनुसार पाणी घालून घोळ तयार करावा. याला 15-20 मिनिट ठेवावे. जेणेकरून रवा फुलेल.
आता या घोळ मध्ये वरील सर्व भाज्या आणि हरवी कोथिंबीर घालावी. व चवीनुसार मीठ आणि तिखट घालावे.
आता एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे घालावे.हा तडका घोळ मध्ये घालावा.
तवा गरम करून तेल लावावे व त्यावर हे घोळ पसरवावे. याला मध्यम गॅस वर कुरकुरीत होऊ द्यावे व दुसऱ्या बाजूने तेल लावावे.
तर चला तयार आहे आपले ओट्स उत्तपम जे गरम गरम नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik