Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पावसाळा विशेष : झटपट बनवा मसाला बटर स्वीट कॉर्न, जाणून घ्या रेसिपी

Corn
, शनिवार, 6 जुलै 2024 (07:00 IST)
Butter Sweet Corn Recipe: तुम्ही पावसाळ्यात लोणी लावलेले कणीस खाल्ले आहे का? पावसाळ्यात कणीस खाण्याची मजा काही वेगळीच असते. आपण ही रेसिपी अगदी बाजार सारखीच घरी देखील करू शकतो. तर चला बनवू या मसाला बटर स्वीट कॉर्न. लिहून घ्या रेसिपी 
 
साहित्य- 
2-3 मध्यम आकाराचे कणीस 
2-3 मोठे चमचे लोणी 
1 चमचा लिंबाचा रस 
मीठ चवीनुसार 
मिरे पूड 
चाट मसाला 
 
कृती- 
सर्वात आधी कणीसचे दाणे वेगळे करावे. व धुवून घ्यावे 
एका मोठ्या पातेलीत पाणी घालून मीठ घालावे व उकळून घ्या.
दाण्यांना उकळत्या पाण्यामध्ये घालावे. 10-15 मिनिट कणीस दाणे नरम होइसपर्यंत उकळून घ्यावे.
उकळलेले कणसाचे दाणे गाळून घ्यावे.
आता लोणी तयार करा.
एका वाटीमध्ये लोणी वितळवावे.
यामध्ये लिंबाचा रस, मीठ आणि मिरे पूड घालावी.  
कणसाच्या दाण्यांवर लोणी लावावे.
आता प्लेट मध्ये ठेवावे.
जर तुम्हाला चाट मसाला आवडत असेल तर वरून तुम्ही घालू शकतात.
गरम गरम सर्व्ह करू शकतात. हा साधा आणि चविष्ट नाश्ता एनर्जीने भरपूर आहे. तसेच ही रेसीपी देखील अगदी सोपी आहे. तुम्हाला इच्छा असेल तर केव्हाही बनवू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हालाही दिवसभर अशक्तपणा वाटतो का, आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा